शिरूरमध्ये ४२ छोट्या व्यावसायिकांना बिनव्याजी कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:29 AM2021-03-15T04:29:28+5:302021-03-15T04:29:28+5:30

शिरूर कासार : प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत नगर पंचायतीच्यावतीने शहरातील ४२ पथ विक्रेते व छोट्या व्यावसायिकांना ...

Interest free loans to 42 small businesses in Shirur | शिरूरमध्ये ४२ छोट्या व्यावसायिकांना बिनव्याजी कर्ज

शिरूरमध्ये ४२ छोट्या व्यावसायिकांना बिनव्याजी कर्ज

Next

शिरूर कासार : प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत नगर पंचायतीच्यावतीने शहरातील ४२ पथ विक्रेते व छोट्या व्यावसायिकांना प्रत्येकी दहा हजार रुपयांप्रमाणे ४ लाख वीस हजार रुपयांचे बिनव्याजी कर्ज मंजुरीचे पत्र देण्यात आले. हे बिनव्याजी कर्ज मात्र वर्षभरात परतफेड करावे लागणार आहे.

नगरपंचायत कार्यालयात मंगळवारी भारतीय स्टेट बँक शाखा शिरूरचे शाखा व्यवस्थापक उमेश आडगांवकर यांच्या उपस्थितीत व मुख्याधिकारी किशोर सानप यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पथ विक्रेत्यांना कर्ज मंजुरी पत्र देण्यात आले. यात प्रामुख्याने छोटे व्यवसाय करणारे तसेच पथ विक्रेत्यांचा समावेश आहे. राजेंद्र काळुराम घोरपडे (टेलरींग), शेख अजीज (फळविकेता), बाळू वारे (भाजी विक्रेता), शब्दर असराफ (फळ विक्रेता ), अमोल काटे (काॅम्प्युटर), नागेश तोडकर (झेराॅक्स) आदी ४२ लोकांना हे मंजुरी पत्र वाटप करण्यात आले. या योजनेचा पथ विक्रेत्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी किशोर सानप यांनी केले. घेतलेले बिनव्याजी कर्ज मुदतीत परतफेडीचे आवाहन शाखाधिकारी उमेश आडगांवकर यांनी केले आहे.

फोटो

आत्मनिर्भर योजनेतून बिनव्याजी कर्ज मंजुरी पत्र देताना मुख्याधिकारी किशोर सानप यांच्यासह भारतीय स्टेट बँक शाखा व्यवस्थापक उमेश आडगांवकर व लाभार्थी राजेंद्र घोरपडे.

===Photopath===

140321\vijaykumar gadekar_img-20210310-wa0024_14.jpg

===Caption===

शिरूर कासार येथे आत्मनिर्भर योजनेंतर्गत ४२ छोट्या विक्रेत्यांना कर्जमंजुरी पत्र देऊन पुढी कार्यवही सुरू करण्यात आली.

Web Title: Interest free loans to 42 small businesses in Shirur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.