अपहार प्रकरणी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्यासह दोघांना अंतरिम जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 07:06 PM2020-03-06T19:06:38+5:302020-03-06T19:07:57+5:30

नगर परिषदेत कोट्यवधी रुपयांचा अपहार प्रकरणी तीन मुख्याधिकारी व इतर चार कर्मचारी यांचेवर गुन्हे दाखल आहेत

Interim bail to Nagaradhyakshy Sahal Chaus with two in connection with the abduction case | अपहार प्रकरणी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्यासह दोघांना अंतरिम जामीन

अपहार प्रकरणी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्यासह दोघांना अंतरिम जामीन

Next
ठळक मुद्देलेखापाल अशोक कुलकर्णी याची दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा पोलीस कोठडी कायम

माजलगाव : येथील नगर परिषदेत अपहार प्रकरणी अटकेत असलेले नगराध्यक्ष सहाल चाऊस व मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे  यांची येथील न्यायालयाने  अंतरिम जामीनीवर सुटका केली तर लेखापाल अशोक कुलकर्णी याची दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा पोलीस कोठडी कायम ठेवली आहे.

येथील नगर परिषदेत कोट्यवधी रुपयांचा अपहार प्रकरणी तीन मुख्याधिकारी व इतर चार कर्मचारी यांचेवर गुन्हे दाखल आहेत.याच प्रकरणात नगराध्यक्ष चाऊस यांना बुधवारी नगर परिषद कार्यालयात पोलिसांनी अटक केली होती.तर मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे ,लेखापाल अशोक कुलकर्णी ( वांगीकर )हे दोघे स्वतः पोलिसांकडे हजर झाले होते. या तिघांनाही  येथील न्यायालयाने शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.त्यामुळे तिघेही जण बीड पोलीस मुख्यालयात तपासासाठी ठेवण्यात आले होते

दोन दिवसांच्या तपासानंतर आज शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सहाल चाऊस , मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे ,लेखापाल अशोक कुलकर्णी  यांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती पी ए वाघमारे यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली, त्यानंतर चाऊस व येलगट्टे यांची दि.११ पर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात येऊन सुटका करण्यात आली.त्यांना मंगळवारी दि.११ रोजी पुन्हा न्यायालयासमोर हजर व्हावे लागणार आहे. तर लेखापाल अशोक कुलकर्णी यांना दुसऱ्या गुन्ह्यात कायम ठेवून पोलीस कोठडी कायम राहिली आहे.

Web Title: Interim bail to Nagaradhyakshy Sahal Chaus with two in connection with the abduction case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.