बेकायदा बांधकामाला माजलगाव न्यायालयाची अंतरिम स्थगिती - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:30 AM2021-02-07T04:30:53+5:302021-02-07T04:30:53+5:30
माजलगाव : येथील बायपास रोडवरील गोकुळधाम फेज - २च्या उत्तर बाजूने सुशीलकुमार बन्सीधर सोळंके यांच्याकडून होत असलेल्या बेकायदेशीर बांधकामाला ...
माजलगाव : येथील बायपास रोडवरील गोकुळधाम फेज - २च्या उत्तर बाजूने सुशीलकुमार बन्सीधर सोळंके यांच्याकडून होत असलेल्या बेकायदेशीर बांधकामाला माजलगाव येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश आर. के. गुज्जर यांनी मंगळवारी अंतरिम मनाई हुकूम देत बांधकामाला स्थगिती दिली आहे. गोकुळधाम फेज - २ मधील रहिवाशांनी माजलगाव येथील वरिष्ठ स्तर न्यायालयात मनाई हुकूमाचा दावा दिला आहे. या दाव्यात मनाई हुकूमाच्या अर्जावर वरिष्ठ न्यायालयाने गोकुळधाम फेज - २च्या उत्तर बाजूने सुशीलकुमार सोळंके, नाईस बिल्डर, शाकेर शेख व सुनील भुतडा हे बेकायदेशीर बांधकाम करत होते. त्यामुळे गोकुळधाम फेज - २च्या निवासी सदनिकांच्या खिडक्या, गॅलरी, सज्जे, बाथरूम, संडास, आऊटलेट व इतर बाह्य वितरिका झाकून जात होत्या. तसेच हवा व सूर्यप्रकाश येणे बंद झाले होते. प्रत्येक फेजमध्ये प्रस्तावित नकाशानुसार दीड मीटरचे अंतर ठेवणे बंधनकारक होते, परंतु सदरची बाब दुर्लक्षित करून बळजबरीने सोळंके हे बेकायदेशीर बांधकाम खोटी व चुकीची कागदपत्रे तयार करून करत होते. या बांधकामाला माजलगाव न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. गोकुळधाम फेज - २च्यावतीने ॲड. व्ही. व्ही. फपाळ व टी. एन. कोल्हे हे न्यायालयीन काम पाहत आहेत.