बीडमध्ये इंटरनेट लाईन तोडली; दीड हजार ग्राहक ‘आॅफलाईन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 12:22 AM2018-01-09T00:22:06+5:302018-01-09T00:22:06+5:30

बीड शहरातील सुभाष रोडवर सुरु असलेल्या रस्ता कामामुळे चुकीच्या पद्धतीने खोदकाम केल्यामुळे मेन इंटरनेट लाईन पूर्णत: डॅमेज झाली असून मागील तीन दिवसांपासून दूरध्वनी व इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.

Internet connection broke into Beed; 1.5 thousand customers 'offline' | बीडमध्ये इंटरनेट लाईन तोडली; दीड हजार ग्राहक ‘आॅफलाईन’

बीडमध्ये इंटरनेट लाईन तोडली; दीड हजार ग्राहक ‘आॅफलाईन’

googlenewsNext
ठळक मुद्देबँका, व्यापारी प्रतिष्ठानातील कामे खोळंबली

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरातील सुभाष रोडवर सुरु असलेल्या रस्ता कामामुळे चुकीच्या पद्धतीने खोदकाम केल्यामुळे मेन इंटरनेट लाईन पूर्णत: डॅमेज झाली असून मागील तीन दिवसांपासून दूरध्वनी व इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे बीएसएनएलचा महसूल तर बुडाला परंतू दीड हजार ग्राहकांना आणि बॅँकांना याचा मोठा फटका बसला आहे.

शहरातील अण्णाभाऊ साठे चौक ते सुभाष रोड आणि बशिरगंज ते भाजीमंडई, सुभाष रोडपर्यंत सिमेंट रस्त्याचे काम सुरु आहे. आधी गटारींचे काम व नंतर रस्त्याचे काम होत आहे. सुभाष रोड येथून भाजीमंडई व स्टेडियमकडे जाणाºया दोन्ही वळणावर गटारींचे स्लॅब टाकण्याचे काम सुरु आहे. या ठिकाणी कोणताही विचार न करता पोकलेनने रस्ता फोडल्याने बीएसएनएलची इंटरनेट मेन लाईन पूर्णपणे ध्वस्त झाली.
त्यामुळे ६ जानेवारी रोजी दुपारी चारवाजेपासून इंटरनेट सेवा बंद पडली व दूरध्वनी यंत्रणा कोलमडली. विशेष म्हणजे एका ठिकाणी हे केबल तुटल्याचे लक्षात आल्यानंतर स्टेडियमकडे जाणा-या वळणावरही हे केबल तोडण्यात आले. परिणामी या सेवा वापरणाºया ग्राहकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

शनिवारी हे केबल तुटले. त्यामुळे सोमवारपासून केबल शोधण्याचे काम सुरु होते. हे काम अत्यंत जिकीरीचे व अवघड असल्याचे संबंधितांनी सांगितले. त्यामुळे मोठे केबल टाकून सुरळीत सेवेला किमान दोन आठवड्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. पुढील रस्ता कामाच्या वेळी दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

बीडमध्ये अशी जाते इंटरनेट मेनलाईन
बशिरगंजमधील टेलिफोन एक्सचेंजपासून ही मेनलाईन आहे. हिरालाल चौक, एमआयडीसी, सहयोगनगर, जिजामाता चौक, जालना रोड, आनंदवाडी परिसरापर्यंत, शाहूनगरचे दोन्ही भाग या मेनलाईनला जोडलेले होते. केबल तुटल्याने या परिसरातील जवळपास १५०० ग्राहकांना फटका बसला आहे.

६ जोनवारीपासून इंटरनेट सेवा ठप्पमुळे बॅँका, व्यापारी प्रतिष्ठान, खाजगी सेवादार कंपन्यांची कार्यालये, वर्तमानपत्र कार्यालय, डिजीटल पेमेंट करणारे व घरगुती वापर करणारे ग्राहक तसेच इंटरनेटचा वापर करणा-यांना मोठा फटका बसला असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

जी.एम. म्हणाले, खूप वैतागलो !
केबल लाईन तुटल्याने बीएसएनएलचे महाप्रबंधक टी. बी. मुंडे यांना विचारणा केली असता आधी थातूरमातूर उत्तर दिले. जबाबदारी लक्षात आणून दिल्यानंतर केबल न. प. ने तोडल्यामुळे ही समस्या असल्याचे ते म्हणाले. सोमवारी २५- ३० फोन आले. खूप वैतागलो, पर्यायी मार्ग काढणे अशक्य असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Internet connection broke into Beed; 1.5 thousand customers 'offline'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.