खंडित वीज पुरवठा अवैधपणे जोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:28 AM2021-01-17T04:28:30+5:302021-01-17T04:28:30+5:30

गेवराई : वीज पुरवठा खंडित केलेला असतानादेखील बेकायदेशीर पद्धतीने वीज जोडणी करताना पकडून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील ...

Interrupted power supply connected illegally | खंडित वीज पुरवठा अवैधपणे जोडला

खंडित वीज पुरवठा अवैधपणे जोडला

Next

गेवराई : वीज पुरवठा खंडित केलेला असतानादेखील बेकायदेशीर पद्धतीने वीज जोडणी करताना पकडून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील गणेशनगर भागात ही कारवाई करण्यात आली.

शहरातील गणेशनगर भागात राहणारे बिलगुडे यांच्याकडे थकबाकी असल्याने महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा वीजपुरवठा तोडला होता. गुरुवारी संबंधित ग्राहकाने इतर दोघांशी संगनमत करून डी.पी.मधील वीज पुरवठा बंद करून अनधिकृतपणे जोडण्याचे काम सुरू केले. दरम्यान, तपासणीसाठी महावितरणचे अधिकारी हे गणेशनगर भागात गेले असता त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्या वेळेस अधिकाऱ्यांनी त्या दोघांना हटकले असता संबंधित व्यक्तीने बिलगुडे यांची वीज जोडण्याकरिता आल्याचे सांगितले. त्यामुळे महावितरणचे उपकार्यकरी अभियंता बालाजी शिवलकर यांनी फिर्याद दिली. बेकायदेशीर वीज जोडणी करून विद्युत कायदा २००३ नुसार कलम १३८ नुसार वीज कंपनीच्या महसुलात हानी पोहोचविण्याचे कृत्य केले म्हणून बळिराम मनोहर बिलगुडे व इतर दोन साथीदारांविरद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Interrupted power supply connected illegally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.