बीड जिल्ह्यात लंपी आजाराचा शिरकाव; शेतकरी-दुग्धव्यावसायिक चिंतेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 11:36 AM2022-09-08T11:36:51+5:302022-09-08T11:37:06+5:30

आष्टी तालुक्यातील देवळाली, इमनगांव येथील जनावरांना लागण 

Intrusion of Lumpy Disease in Beed District; Farmer-dairy concern | बीड जिल्ह्यात लंपी आजाराचा शिरकाव; शेतकरी-दुग्धव्यावसायिक चिंतेत 

बीड जिल्ह्यात लंपी आजाराचा शिरकाव; शेतकरी-दुग्धव्यावसायिक चिंतेत 

Next

 - नितीन कांबळे
कडा (बीड) :
शेजारील अहमदनगर जिल्ह्यात अनेक जनावरांना लंपी आजाराची लागण झाल्यानंतर आता बीड जिल्ह्यात देखील याचा शिरकाव झाला आहे. आष्टी तालुक्यातील पशुधन विकास कार्यालयाने संशयित जनावरांचे पुणे येथील प्रयोग शाळेत पाठविलेले नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तीन गावांपैकी दोन गावांतील जनावरांचे नमुने बाधित आले आहेत. 

आष्टी तालुक्यात लंपी स्कीन संसर्गजन्य आजारांची लागण होऊ नये म्हणून पशुधन विभागाने शीघ्र कृती दल स्थापन केले होते. लसीकरण मोहीम हाती घेतली होती. दरम्यान, देवळाली, इमनगांव व फत्तेवडगाव या तीन गावातील जनावरांना लागण झाल्याचा संशय होता. येथील जनावरांचे नमुने ६ सप्टेंबर रोजी तपासणीसाठी पशुधन विभागाने पुणे येथे पाठवले होते. यातील देवळाली व इमनगांव येथील नमुने गुरूवारी पाॅझिटिव्ह आले असून एका गावातील अहवाल येणे बाकी आहे. लंपी संसर्गजन्य आजाराने शिरकाव केल्याने पशुधन विभाग सक्रिय झाला आहे. 

बाधित जनावरांसह पाच किलोमीटर अंतरावर लसिकरण सुरू 
दोनही ठिकाणी गायीला हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले असून आता पशुधन विकास कार्यालय अंतर्गत त्या गावातील पाच किलोमीटर अंतरावर लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. जनावरे बाधित असली तरी ती ठणठणीत असल्याचे तालुका पशुधन विकास अधिकारी डाॅ.मंगेश ढेरे यांनी सांगितले.

Web Title: Intrusion of Lumpy Disease in Beed District; Farmer-dairy concern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.