निवडणूक खर्चाची पुन्हा चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 11:30 PM2020-03-05T23:30:38+5:302020-03-05T23:31:26+5:30

जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या आदेशानुसार चौकशी समिती नेमली होती.

Investigation of election expenses resumes | निवडणूक खर्चाची पुन्हा चौकशी सुरू

निवडणूक खर्चाची पुन्हा चौकशी सुरू

Next
ठळक मुद्देबीड लोकसभा मतदारसंघ : तक्रार अर्ज वाढले

बीड : जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या आदेशानुसार चौकशी समिती नेमली होती. या समितीने गत महिन्यात चौकशी केली होती. दरम्यान तक्रारी वाढल्याने पुन्हा चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार ६ सदस्यीय समिती ५ मार्च रोजी येथे दाखल झाली असून ६ मार्च रोजीही चौकशी करणार आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणूक खर्चाच्या संदर्भात विभागीय आयुक्तांकडे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार विभागीय स्तरावरून हिंगोलीचे अपर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, राजीव नंदकर, सहाय्यक संचालक लेखा सचिन धस, नायब तहसीलदार चेतन पाटील, सहा.लेखाअधिकारी तारो या ६ जणांची समिती गठित करून चौकशी केली. दरम्यान चौकशी पूर्ण करून त्यांनी विभागीय आयुक्तांकडे अहवाल सादर केला होता. मात्र, चौकशी झाल्यानंतर देखील तक्रारदारांनी असामाधन व्यक्त केले. समिती सदस्यांवर हातमिळवणीचे आरोप केले होते. याच दरम्यान एका अधिकाऱ्याने निनावी निवडणूक खर्चासंदर्भात तक्रार केल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी पुन्हा पारदर्शक व स्वतंत्रपणे चौकशी करून १७ मार्चपर्यंत अहवाल देण्याचे आदेश समितीला दिले आहेत. त्यामुळे चौकशी समितीच्या अहवालानंतरच निवडणूक खर्चाच्या तक्रार व आरोपावर पडदा पडणार आहे.
स्वतंत्रपणे झाली चौकशी
जिल्हाधिकारी कार्यालयात ५ मार्च रोजी सर्व निवडणूक प्रक्रियेशी संबंधित उपविभागीय अधिकारी तहसीलदार तसेच कंत्राटदार व तक्रारदारांची स्वतंत्रपणे चौकशी केली आहे. ६ मार्च रोजी कंत्राटदार व तक्रारदारांची पुन्हा चौकशी होणार आहे.

Web Title: Investigation of election expenses resumes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.