अंबाजोगाई न्यायालयातील चोरीचा तपास लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:22 AM2018-03-15T00:22:05+5:302018-03-15T00:22:14+5:30

अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयाची स्ट्राँग रूम फोडून तब्बल सव्वा चार लाख रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ७ फेब्रुवारी रोजी घडली होती. या घटनेला महिना उलटूनही अद्याप पोलिसांना चोर सापडलेले नाहीत.

Investigation in the theft of Ambajogai court | अंबाजोगाई न्यायालयातील चोरीचा तपास लागेना

अंबाजोगाई न्यायालयातील चोरीचा तपास लागेना

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयाची स्ट्राँग रूम फोडून तब्बल सव्वा चार लाख रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ७ फेब्रुवारी रोजी घडली होती. या घटनेला महिना उलटूनही अद्याप पोलिसांना चोर सापडलेले नाहीत. आतापर्यंत ६० पेक्षा अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. छोट्या-मोठ्या घटनांचा तात्काळ तपास लावून राज्यात अग्रेसर असणाऱ्या बीड पोलिसांना मात्र न्यायालय चोरी प्रकरण उघडकीस आणण्यास अपयश येत असल्याचे दिसून येत आहे.

अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयातील स्ट्राँगरूममध्ये तीन न्यायालयातील मुद्देमाल ठेवलेला होता. ७ फेब्रुवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व इतर साहित्य असा ४ लाख ३२ हजार ९२४ रुपयांचा ऐवज लंपास केला होता. यामध्ये योगेश्वरी देवीच्या दागिन्यांची चोरीतील हस्तगत झालेले २५ तोळे सोन्याचाही समावेश होता. विशेष म्हणजे हे सोने दुसºयांदा चोरी गेले. न्यायालयातच चोरी झाल्याने खळबळ उडाली होती.
या प्रकरणाच्या तपासासाठी तात्काळ विशेष पथके नियुक्त केली होती. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे यांनी या प्रकरणात लक्ष घातले होते. प्रत्येक दिवसाचा आढावा घेत होते. परंतु त्यांना चोरांपर्यत पोहोचण्यात अपयश आल्याचे दिसते.

रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशी - बो-हाडे
घटनेनंतर तात्काळ न्यायालयात येणाºयांची चौकशी केली होती. तसेच रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांची चौकशी करण्यात आलेली आहे. परंतु अद्याप एकही संशयित आढळला नसल्याचे, अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे यांनी सांगितले. काही नावे समोर आली असून त्यांना ताब्यात घेतले जाईल. त्यांची चौकशी केल्यावरच प्रकार समोर येईल. तपास लावण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहेत.

Web Title: Investigation in the theft of Ambajogai court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.