मोकाट गुरांमुळे अपघातास निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:28 AM2021-01-17T04:28:43+5:302021-01-17T04:28:43+5:30
भरधाव वाहनांमुळे अपघातात वाढ अंबाजोगाई : शहरापासून यशवंतराव चव्हाण चौक ते अंबासाखर कारखाना हा चौपदरी रस्ता निर्माण झाला आहे. ...
भरधाव वाहनांमुळे अपघातात वाढ
अंबाजोगाई : शहरापासून यशवंतराव चव्हाण चौक ते अंबासाखर कारखाना हा चौपदरी रस्ता निर्माण झाला आहे. या रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने भरधाव वेगाने चालविली जात असल्याने अपघाताचा धोका वाढत चालला आहे. तरीही या भरधाव वाहनधारकांना पोलिसांकडून गतीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे, परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे.
तहसीलमध्ये निराधारांची गर्दी
धारूर : येथे तहसील कार्यालयातून निराधार व श्रावणबाळ योजनेचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले आहे. हे अनुदान मिळण्यासाठी निराधारांनी टपाल कार्यालयात गर्दी केली आहे. सकाळपासूनच निराधारांच्या रांगा लागलेल्या असतात. गर्दीमुळे निराधारांना ताटकळावे लागत आहे.
हायवेवरील खड्ड्यांनी वाहनधारक त्रस्त
गेवराई : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या खड्डयांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून, हे खड्डे लवकरात लवकर बुजवावेत, अशी मागणी वाहनधारक, नागरिकांमधून होऊ लागली आहे.