अंबाजोगाईत ‘आयपीएल’वर सट्टा; पाच ताब्यात, एक फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:46 AM2019-04-27T00:46:59+5:302019-04-27T00:48:16+5:30
शहरातील नागझरी परीसरात एका घराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत सुुरु असलेल्या आयपीएल सट्ट्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बुधवारी रात्री छापा टाकला.
अंबाजोगाई : शहरातील नागझरी परीसरात एका घराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत सुुरु असलेल्या आयपीएल सट्ट्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बुधवारी रात्री छापा टाकला. यामध्ये पाच सट्टेबाजांना ताब्यात घेतले तर एक फरार आहे. या कारवाईत १ लाख ४५ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलीस अधीक्षांच्या विषेश पथकास नागझरी परीसरात राजस्थान रॉयल व कोलकता नाईट रायडर्स या संघात सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाली. यावेळी पथकाने टाकलेल्या छाप्यात आरोपी गोलाकर बसून मोबाईल फोनवर क्रिकेट सामन्यावर सट्टा घेत असल्याचे दिसून आले. यावेळी श्रीकांत गोपाळराव धायगुडे, राम नंदकिशोर मुळे, अभिषेक संतोषराव कदम, महेश सतिष बलूतकर, उत्तम ज्ञानोबा हांगे या पाच सट्टेबाजांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या कारावाईत आरोपीकडून १ लाख ३८ हजार किंमतीचे १७ मोबाईल फोन आणि नगदी ७ हजार ७२० रुपये असा एकुण १ लाख ४५ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हे सर्व आरोपी सट्टा घेऊन मनोजकुमार साहीलकुमार कालीया याला फोनवर सांगत होते. मनोजकुमार कालिया पोलिसांना गुंगारा देवून फरार झाला आहे. पोउपनि रामकृष्ण सागडे यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ठाण्यात गुन्हा नोंद आहे. ही कारवाई एसपी जी.श्रीधर, अ.अधीक्षक अजित बोºहाडे, विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील रामकृष्ण सागडे, पांडुरंग देवकते, अंकुश वरपे, गणेश नवले, रेवननाथ दुधाने, जयराम उबे, सावंत आदींनी केली.