माजलगावात शासकीय केंद्रावरील खरेदीत अनियमितता; शेतकऱ्यांच्या आक्षेपानंतर प्रशासनाने केला पंचनामा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 04:55 PM2018-11-17T16:55:15+5:302018-11-17T17:07:21+5:30

खरेदी केंद्र सुरु झाल्याबाबत कसल्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही मात्र बाजार आवारात चाललेल्या खरेदीच्या हालचाली पाहुन कांही शेतकर्‍यांना यात शंका आल्यामुळे त्यांनी आक्षेप घेतला.

Irregularities in procurement at Majalgaon Government Center; After the farmers' protest, the administration has made panchnama | माजलगावात शासकीय केंद्रावरील खरेदीत अनियमितता; शेतकऱ्यांच्या आक्षेपानंतर प्रशासनाने केला पंचनामा 

माजलगावात शासकीय केंद्रावरील खरेदीत अनियमितता; शेतकऱ्यांच्या आक्षेपानंतर प्रशासनाने केला पंचनामा 

Next
ठळक मुद्दे सुमारे 1200 शेतकर्‍यांनी आपल्या मुग,उडीद,सोयाबीन पिकाची नोंदणी केली. नोंदणी पश्‍चात अद्याप एकाही शेतकर्‍याला धान्य खरेदी बाबतचा मोबाईल संदेश मिळाला नाही

माजलगाव : शेतकर्‍यांना अंधारात ठेवत दोन दिवसांपूर्वीच शासकिय खरेदी सुरु करुन व्यापार्‍यांचा माल खरेदीसाठी येथील पांढरपेशांनी लढवलेल्या नामी युक्तीचा भांडाफोड शुक्रवारी (दि. 16) झाला. शेतकऱ्यांना आक्षेपानंतर शासनाने महसुल व सहा. निबंधक यांच्या पथकाद्वारे केलेल्या पंचनाम्यातुन खरेदीत अनियमितता आदी बाबी उघड झाल्या. यावरून येथे मोठ्या प्रमाणावर काळा बाजार झाल्याचे किमान पंचनाम्यावरुन तरी निदर्शनास येत आहे. 

माजलगांव येथे शितल कृषि निविष्ठा सहकारी संस्था गिरवली या सहकारी संस्थेला मुग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी शासनाने नियुक्त केले आहे. खरेदीसाठी अधिकृतरित्या सदर संस्थेची नियुक्ती जरी शासनाने केली असली तरी येथील कांही पांढरपेशा नेत्यांनी या सहकारी संस्थेला हाताशी धरुन आर्थिक तडजोड करीत शेतकरी नोंदणीचे काम आपल्या हाती ठेवले. मागील 15 दिवसांपासून नोंदणीचे काम सुरु झाल्यानंतर सुमारे 1200 शेतकर्‍यांनी आपल्या मुग,उडीद,सोयाबीन पिकाची नोंदणी केली. नोंदणी पश्‍चात अद्याप एकाही शेतकर्‍याला धान्य खरेदी बाबतचा मोबाईल संदेश मिळाला नाही तसेच खरेदी केंद्र सुरु झाल्या बाबत कसल्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही मात्र बाजार आवारात चाललेल्या खरेदीच्या हालचाली पाहुन कांही शेतकर्‍यांना यात शंका आल्यामुळे त्यांनी आक्षेप घेतल्यानंतर सदर ठिकाणी मापे सुरु असुन शासकिय बारदाण्यात माल भरला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर एकच गोंधळ उडाला.

शेतकऱ्यांना माहिती न देता कोणाचा माल खरेदी केला

खरेदी केंद्र सुरु नसतांना कोणाचा माल अगोदरच खरेदी केला जात आहे ही बाब मात्र गुलदस्त्यात होती. कारण या ठिकाणी एकाही शेतकर्‍याला माहिती, मोबाईल संदेश, टोकन इत्यादी कांहीच प्रक्रिया घडली नाही नाही मग हा माल आला कुठुन असाही प्रश्‍न उपस्थित झाल्याने शेतकरी संतापले आणि त्यांनी या सर्व छुप्या खरेदीचा पंचनामा प्रशासनाने करण्याची मागणी केल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास महसुल विभाग आणि सहा. निबंधक यांच्या संयुक्त पथकाने या ठिकाणी पंचनामा केला.

खरेदीचे एकही कागदपत्र उपलब्ध नाही

पंचनाम्यातुन अनेक बाबी उघड झाल्या असुन  सदर सुरु असलेल्या खरेदी बाबतचा एकही दस्ताऐवज या ठिकाणी पथकाला आढळला नाही.  पथकातील अधिकार्‍यांनी परवानगी बाबतच्या कागदपत्रांची मागणी केली असता सदर कागदपत्रे ही अंबाजोगाई येथील संस्थेच्या कार्यालयात असल्याचे सांगीतले तसेच शेतकरी नोंदणी , टोकन इत्यादी कसल्याही प्रकारचे अभिलेखे येथील संस्थेच्या उपस्थित असलेल्या  कर्मचार्‍याकडे आढळुन आली नाहीत त्यामुळे या पंचनाम्यावरुन तरी सदरील सर्वच कडधान्य खरेदी ही बोगस असल्याचे सिध्द होत असल्याने सदर संपुर्ण माल जप्त करुन शासनाने ताब्यात घेण्याची मागणी शेतकर्‍यांमधुन होत आहे. 

यामागचे गौडबंगाल काय?
शासकिय खरेदीसाठी असमर्थता दाखवुन केवळ ऑनलाईनचे काम खरेदीविक्री संघाने आपल्याकडे घेतले ते कशासाठी याची उकल आता होत असुन व्यापार्‍यांनी सणासुदीच्या काळात शेतकरी अडचणीत असतांना कमीभावाने खरेदी केलेला मुग, उडीद, सोयाबीन हा माल सर्वात अगोदर शासनाला खपवुन आपले उखळ पांढरे करण्यासाठी हा सर्व प्रताप घडवुन आणल्याचे निदर्शनास येत आहे. 

केंद्र बंद झाल्याने शेतकरी त्रस्त 
15 दिवसांपासुन नोंद करुन ठेवलेल्या एकाही शेतकर्‍याचा छटाकभरही माल अजुन खरेदी केंद्रावर नाही त्यात काल घडलेल्या प्रकारामुळे पुन्हा खरेदी केंद्र कधी सुरु होईल याची शास्वती नाही. त्यामुळे खरा शेतकरी अत्यंत त्रस्त झाला आहे. आतातर ऑनलाईन नोंदणी देखील चालु नसल्यामुळे आता माल कोठे विकावा या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. 
 

आमदार देशमुखांनी घेतली दखल
शासकिय खरेदी केंद्रावर पदाचा गैरफायदा घेवून शेतकर्‍यांच्या आडुन व्यापार्‍यांना फायदा पोहचविण्यात आला. पोंचविण्यासाठीच्या घडलेल्या प्रकाराची तक्रार ही पणन मंत्र्यांकडे आ.आर.टी. देशमुख करणार असल्याची माहिती भाजपाचे नितीन नाईकनवरे यांनी दिली.

अहवाल वरिष्ठांना पाठवला 
शेतकर्‍यांच्या तक्रारीनंतर सदरील केंद्राचा पंचनामा केला असता केंद्र चालकाकडे कसल्याही प्रकारचे अभिलेखे आढळुन आलेले नाहीत. त्यामुळे खरेदीचा कारभार हा अनागोंदी निदर्शनास येत असल्या बाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात आला आहे. 
- एल.टी. डावरे , सहकार अधिकारी सहा.निबंधक कार्यालय

Web Title: Irregularities in procurement at Majalgaon Government Center; After the farmers' protest, the administration has made panchnama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.