धारूरच्या वनपरिक्षेत्र कार्यालयास आयएसओ मानाकंन; ठरले राज्यातील पहिले तालूकास्तरीय कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 12:00 PM2021-02-09T12:00:23+5:302021-02-09T12:02:25+5:30

forest department वनपरिक्षेत्र कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोना लॉकडाऊननंतर एकजूटीने कार्यालयाचा चेहरामोहरा बदलला आहे.

ISO Manakan to Dharur Forest Range Office; Became the first taluka level office in the state | धारूरच्या वनपरिक्षेत्र कार्यालयास आयएसओ मानाकंन; ठरले राज्यातील पहिले तालूकास्तरीय कार्यालय

धारूरच्या वनपरिक्षेत्र कार्यालयास आयएसओ मानाकंन; ठरले राज्यातील पहिले तालूकास्तरीय कार्यालय

googlenewsNext

धारूर  :  अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एकजूटीने केलेल्या कामामुळे येथील येथील वनपरिक्षेत्र कार्यालय आयएसओ मानाकंन प्रमाणपञ मिळवणारे राज्यातील पहीले तालुकास्तरीय कार्यालय ठरले आहे. कार्यालयाचा चेहरा मोहरा बदलला असून या कार्यालयास नुकतेच आयएसओ मानाकंन प्रमाणपञ देऊन गौरव करण्यात आला.

येथील वनपरिक्षेत्र कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोना लॉकडाऊननंतर एकजूटीने कार्यालयाचा चेहरामोहरा बदलला आहे. या कठीण काळाचा सदुपयोग केला या मेहनतीचे फळ आता मिळाले असून हे तालूका वनकार्यालय राज्यातले पहीले आयएसओ मानांकन प्राप्त वनपरिक्षेत्र कार्यालय ठरले आहे. मानंकनांचा गौरव सोहळा नुकताच पार पडला. यावेळी विभागीय वनअधिकारी  एम.बी. तेंलग,  नायब तहसीलदार प्रकाश गोपड, आयएसओ समन्वयक प्रा. प्रशांत जोशी, अमोल कांबळे, परळीचे वन परीक्षेञ अधिकारी भगवान गिते, धारूरचे  वनपरीक्षेञ अधिकारी  एम. एस. मुंडे, वन परीमंडळ आधिकारी एम एस बहीरलवाल शंकर वरवटे वनपाल कस्तूरे आदी अधिकारी - कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. 

यावेळी विभागीय वनअधिकारी एम.बी. तेलंग यांनी, कार्यालय दुर्गम भागात असतानाही आयएसओ मानाकंन प्राप्त करते. हे कौतूकास्पद असून चांगल्या कामासाठी योग्य नियोजन केले तर विचार करण्याची गरज पडत नाही. यातून शिस्त येते व कामाचे समाधान मिळते असे मत व्यक्त केले. तसेच प्रशांत जोशी यांनी, बांधील की जपली तर कार्यालय आदर्श बनते. एकजूटीचे हे यश असून आता दैंनदीन कामात फरक जाणवेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच मानांकन पद्धत समजावून सांगितली. तर नायब तहसीलदार प्रकाश गोपड यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तावीक वनपरीक्षेञ अधिकारी एम.बी. मुंडे यांनी तर आभार वन परिमंडळ अधिकारी शंकर वरवटे यांनी व्यक्त केले. 

Web Title: ISO Manakan to Dharur Forest Range Office; Became the first taluka level office in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.