परळी पालिकेतील सेवानिवृत्तांचा प्रश्न मार्गी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:35 AM2021-04-09T04:35:16+5:302021-04-09T04:35:16+5:30
परळी : येथील नगर परिषदेच्या दोनशे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे जानेवारी २०२१ ते मार्च २०२१ या तीन महिन्यांचे थकित वेतन अदा ...
परळी : येथील नगर परिषदेच्या दोनशे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे जानेवारी २०२१ ते मार्च २०२१ या तीन महिन्यांचे थकित वेतन अदा करावे अशी मागणी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने ८ एप्रिल रोजी परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्याकडे केली. दरम्यान हा प्रश्न चर्चेनंतर मार्गी लागला आहे.
सेवानिवृत्त कर्मचारी नेते जगन्नाथ शहाणे म्हणाले की,नगर परिषद प्रशासन कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन वेळेवर करीत नाही.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे जानेवारी २०२१ ते मार्च २०२१ चे वेतन
करावे. सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची थकित रक्कम त्वरीत द्यावी, सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या डी.ए.ची थकीत रक्कम त्वरीत द्यावी, आदी मागण्यांसाठी गुरुवारी सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र समाधानकारक तोडगा न निघाल्याने शिष्टमंडळाने पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात जाऊन परळी न .प .चे गट नेते वाल्मिक कराड यांची भेट घेतली व पुन्हा मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार सेवा निवृत कर्मचाऱ्यांना तातडीने थकित वेतन देण्याच्या सूचना वाल्मिक कराड यांनी न. प. मुख्याधिकाऱ्यांना केली. त्यानुसार दोन दिवसात थकित वेतन दिले जाईल असे आश्वासन मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी दिले. याबद्दल सेवानिवृत कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केल्याचे युनियनचे नेते जगन्नाथ भगवानराव शहाणे यांनी सांगितले. या वेळी युनियनचे नेते प्रा. बी. जी. खाडे, बाळासाहेब गंगाधर देशमुख, नारायण भोसले, तु.रा .बनसोडे. व इतर सेवा निवृत कर्मचारी होते.
===Photopath===
080421\img20210408111254_14.jpg