उपवासाला साबुदाणा न खाल्लेलाच बरा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:37 IST2021-08-12T04:37:07+5:302021-08-12T04:37:07+5:30
बीड : श्रावण महिना सुरू झाला आहे. त्यामुळे उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढते. परिणामी भगर आणि साबुदाण्याचे दर वाढले आहेत. ...

उपवासाला साबुदाणा न खाल्लेलाच बरा !
बीड : श्रावण महिना सुरू झाला आहे. त्यामुळे उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढते. परिणामी भगर आणि साबुदाण्याचे दर वाढले आहेत. उपवासात एनर्जी देणारे पदार्थ चवीला आणि आरोग्याच्या दृष्टीने चांगले मानले जाते. साबुदाणा खाल्ल्याने पेशींची वाढ होते. वजनवाढीसाठी उपयुक्त, हाडे मजबूत होतात. अशक्तपणा कमी होतो. यात सायनाइडचे प्रमाण कमी असलेतरी जास्त खाल्ल्याने विविध आजारांचा धोका उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे उपवासात अनेक जण प्रमाणात सेवन करतात, तर साबुदाणा वर्ज्य करून अन्य पदार्थ खाण्याकडे अनेक लाेक वळत आहेत.
उपवासाच्या पदार्थांचे दर (प्रति किलो)
१० जुलै १० ऑगस्ट
भगर ११५ १२५
साबुदाणा ५५ ६०
नायलॉन साबुदाणा ७५ ८०
२) दर का वाढले?
नाशिक जिल्हा व घोटी परिसरात यंदा पीक कमी असल्याने भगरचे उत्पादन कमी झाले आहे. तर, तामिळनाडूच्या सेलम भागातही साबुकंद पीक कमी आहे. यातच वाहतूक दर वाढल्याने भाव काहीसे वधारले आहेत. जुलैच्या तुलनेत भगरीच्या दरात किलोमागे १० रुपयांची वाढ झाली आहे. साबुदाणादेखील किलोमागे ५ रुपयांनी वधारला आहे. मात्र, भाव स्थिरच असल्याचे सांगण्यात येते.
३) साबुदाणा आरोग्याला हानिकारक
जास्त साबुदाणा खाण्याचे परिणाम घातक आहेत. साबुदाण्यात कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे मधुमेहाची पातळी वाढते. साबुदाणा खाण्याआधी मधुमेहींनी डॉक्टरी सल्ला घेणे महत्त्वाचे. जास्त साबुदाणा खाल्ल्याने स्थूलपणा आणि वजन वाढू शकते. त्यामुळे अधिक सेवन मेंदू, हृदय, कोमा, श्वास घेण्यात अडथळा, छाती दुखणे, रक्तविकार, डोकेदुखी, थायरॉइड असे आजार बळावू शकतात. विशेषत: कॅन्सरला आमंत्रण ठरू शकते, असे विविध तज्ज्ञांचे मत आहे.
४) उपवास आहे, मग हे पदार्थ खा !
उपवासाच्या दिवशी जास्तीत जास्त फळांचे सेवन करणे चांगले. फळांमध्ये प्रोटीन आणि पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने थकवा न येता पाणीप्रमाण कमी होणार नाही. गूळ, शेंगदाण्याची चिक्की, राजगिरा लाडू खाल्ल्याने थकवा जाणवत नाही, ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राहते. नारळ पाण्याच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात.
- मितेश गवते, आहारतज्ज्ञ बीड.