जमीन घोटाळ्याशी संबंध नाही, हे विरोधकांचे षडयंत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 10:07 AM2022-12-02T10:07:10+5:302022-12-02T10:07:35+5:30

आ. धस यांचा खुलासा, चौकशीसाठी तयार

It has nothing to do with the land scam, this is a conspiracy by the opposition | जमीन घोटाळ्याशी संबंध नाही, हे विरोधकांचे षडयंत्र

जमीन घोटाळ्याशी संबंध नाही, हे विरोधकांचे षडयंत्र

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क    
आष्टी/कडा (जि. बीड) : देवस्थान जमीन घोटाळ्याशी आपला कुठलाही  संबंध नाही, हे विरोधकांचे षड्यंत्र असल्याचा आरोप आ. सुरेश धस यांनी  गुरुवारी केला. 

तालुक्यातील देवस्थान  जमिनीच्या बेकायदा हस्तांतरणप्रकरणी २९ नोव्हेंबरला आ. धस, पत्नी प्राजक्ता व बंधू देवीदास यांच्यावर गुन्हा नोंद झाल्याने खळबळ उडाली होती. यावर आष्टी येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी खुलासा केला. ते म्हणाले, देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणातील जमिनी माझ्या व माझ्या कुटुंबाच्या नावावर नाहीत, निराधार तक्रारातील वाक्यरचनेमुळे गुन्हे दाखल झाले आहेत. मी जुन्या पक्षात काम करत असताना राज्य व जिल्हास्तरावरील नेते दुखावले गेले असू शकतात, त्यामुळे त्यांनी हे खोटेनाटे आरोप करून यात गोवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.  बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे सांगून आ. धस यांनी चौकशीत यंत्रणेला सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली.

Web Title: It has nothing to do with the land scam, this is a conspiracy by the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.