कोरोनामुक्त गावांतही शाळा सुरू करणे अशक्यच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:21 AM2021-06-30T04:21:39+5:302021-06-30T04:21:39+5:30
बीड : कोरोनामुक्त गावांत पाचवी ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू करता येतील का, याचा आढावा घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. ...
बीड : कोरोनामुक्त गावांत पाचवी ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू करता येतील का, याचा आढावा घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार चाचपणी सुरू असली तरी दुसऱ्या लाटेच्या होरपळीनंतर मागील आठवड्यात राज्यात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्याने शासनाने तिसऱ्या स्तरातले निर्बंध कडक केले आहेत. मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागात पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने संसर्ग रोखण्याच्या उपाययोजना पाहता जिल्ह्यात गाव कोरोनामुक्त असले तरी शाळा सुरू होण्याची शक्यता सध्यातरी कमीच आहे. मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून शाळा बंद आहेत. जूनमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी शाळा उघडण्यास आणि वर्ग भरण्यास सहा महिने लागले. तरीही कोरोनाच्या भीतीपोटी विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण कमीच राहिले. पाचवी ते आठवीचे वर्ग तर दीड महिनेच भरले. त्यामुळे पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नत करण्याचा निर्णय घेण्यात आला. दहावी आणि बारावीच्या परीक्षाही रद्द करून मूल्यांकनाचे निकष ठरवून निकाल देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर १५ जून २०२१ पासून पुढील शैक्षणिक वर्ष सुरू झाले, मात्र शाळा बंदच आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करता येतील का? याबाबत माहिती घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार प्रशासकीय पातळीवर बैठकांमधून कानोसा घेतला.
बीड जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोना रोखण्यासाठी तालुका व जिल्हास्तरावरून नियंत्रण समित्या नेमल्या होत्या. ग्रामसेवक, सरपंचांशी तसेच ग्रामस्थांशी संपर्क साधून गाव सुरक्षेसाठी दक्षतेचे आवाहन केले. ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला, त्यामुळे ११८ गावांमध्ये कोरोना रोखण्यात यश आले आहे. असे असता राज्यात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्याने तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने जिल्ह्यात शाळा सुरू हाेण्याची शक्यता नसल्याने हेही वर्ष तसेच जाते की काय? असे पालकांना वाटत आहे.
जिल्ह्यातील एकूण गावे - १०७३
सध्या कोरोनामुक्त असलेली गावे- ११८
तालुकानिहाय कोरोनामुक्त गावे
अंबाजोगाई- ९,
आष्टी- ८,
बीड- १४,
धारूर- ३६,
गेवराई- ४१,
केज- ४,
माजलगाव- ५,
पाटोदा-१
परळी
वडवणी
शिरूर
जिल्ह्यातील एकूण शाळा -
जिल्हा परिषद शाळा - २४९१
अनुदानित शाळा - ७४९
विनाअनिदानित शाळा - ४३७
२) कोणत्या वर्गात किती विद्यार्थी?
ग्राफ
पाचवी - ५२,८३३
सहावी- ५२,८९७
सातवी- ५२,०४१
आठवी- ५१,८०२
शिक्षण अधिकाऱ्याचा कोट
कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याबाबत व्हीसीमध्ये सचिवांनी चर्चा केली होती. कोरोनाची स्थिती व शाळा सुरू करण्याबाबत प्राथमिक माहिती म्हणून हा मुद्दा चर्चेत घेतला होता. त्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. शासनाचे आदेश तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कार्यवाही केली जाईल. - श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी, (प्रा) बीड.
-----