ऐकावे ते नवलंच, ईव्हीएम मशीनमध्येच टाकले फेवीक्विक
By शिरीष शिंदे | Published: December 18, 2022 06:21 PM2022-12-18T18:21:52+5:302022-12-18T18:22:16+5:30
सरपंच पदाच्या उमेदवाराचे बटन लॉक करण्याचा प्रयत्न
बीड: आपल्या पॅनलचा सरपंच व सदस्य निवडणूक यावे यासाठी अनेकजण वेगवेगळ्या कल्पकृत्या लढवितात आहे. असाच एक प्रकार बीड तालुक्यातील बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील मतदान केंद्रावर घडला. एका मतदाराने एका सरपंच पदाच्या उमेदवाराच्या नावासमोर चक्क फेवीक्विक टाकून मतदान बटन लॉक करण्याचा प्रयत्न केला. वेळीच हा प्रकार समोर आल्याने मतदान केंद्राध्यक्षाने तात्काळ वोटींग मशीन बदलून देऊन मतदान प्रक्रिया सुरळीत केली.
बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्व प्रक्रिया शांततेत सुरु असताना वार्ड क्रमांक २ येथील वोटींग पॅड लॉक झाला असल्याची तोंडी तक्रार एका मतदाराने केली. त्यावेळी ड्युटीवर असलेले मतदान अधिकारी यांनी तेथे जाऊन तपासणी केली असता वोटींग मशीनची काही बटने लॉक असल्याची बाब निदर्शनास आली. जवळच रिकामे फेवीक्विकचे रिकामे पाकीट ही सापडले. त्यामुळे वोटींग मशीनमध्ये फेवीक्विक टाकले असल्याचा संशय मतदान केंद्राध्यक्षांना आला. त्यामुळे याची माहिती झोनल अधिकाऱ्यांनी पोलीस व तहसिलदारांना दिली. संबंधित मतदाराने ॲड. गणेश वाणी या उमेदवाराच्या नावासमोर फेवीक्विक लिक्वीड टाकले. परंतु, फेवीक्विक लिक्वीड स्वरुपात असल्याने ते व्होटींगच्या पॅडमध्ये पसरल्याने ते लॉक झाले. मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांनी वोटींग पॅड लॉक झाला. या उमेदवारासमोरील मतदानाचे बटन लॉक व्हावे असा उद्देश त्या मतदाराचा असावा असा अंदाज यावेळी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. त्यानंतर तात्काळ फेवीक्विक मशीन बदलून देऊन मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली.
कारवाईची केली मागणी
लिंबागणेश येथील ग्रामपंचायत निवडणुकीमधील सरपंच पदासाठीचे उमेदवार ॲड. गणेश वाणी यांनी केंद्राध्यक्ष श्रीराम सुरवसे यांच्याकडे तक्रार केली. ॲड. वाणी यांच्या शिट्टी या नावासमोरील बटनावर फेवीक्विक टाकून ते बटन बंद करण्यात आले आहे. त्याचा पुरावा मतदान केंद्रात सापडला आहे. हा प्रकार जाणीवपुर्वक कट रचून केला असून अनुचित प्रकार घडवला आहे. या प्रकरणीची दखल घेऊन दोषीवर कारवाई करावी तसेच प्रभाग क्रमांक २ चे फेर मतदान घ्यावे अशी मागणी केंद्राध्यक्ष श्रीराम सुरवसे यांच्याकडे केली आहे.
लिंबागणेशचे झोनल अधिकारी म्हणाले की, वोटींग मशीन लॉक झाली होती. मतदारांनी हीबाब सांगताच बदलून देण्यात आली. त्याच ठिकाणी फेवीक्विकचे रिकामे पाटील आढळून आले आहे. याची माहिती पोलिसांना दिली आहे. तपासणी केली जात असून अधिक माहिती तहसिलदारांकडून घ्यावी असे त्यांनी सांगितले.