'राष्ट्रवादीला संपवणे हे 206 कोटी रुपयांची चिक्की खाण्याएवढं सोपं नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 11:12 PM2019-02-21T23:12:53+5:302019-02-21T23:15:07+5:30
परळीत शनिवार २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्र पक्षाच्या महाआघाडीच्या संयुक्त सभेच्या व परिवर्तन यात्रेच्या तयारी संदर्भात परळी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.
बीड - विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळीतच ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर जबरी टीका. राष्ट्रवादीला संपवणे म्हणजे चक्की खाण्याएवढं सोपं काम नाही, अशा शब्दात धनंजय यांनी पुन्हा एकदा पंकजा मुंडेंच्या चिक्की घोटाळ्यावर लक्ष वेधले आहे. केंद्रात सत्ता असतानाही यांना परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा केंद्राच्या बारा ज्योतिर्लिंगाच्या यादीत समावेश करता आला नाही. ज्यांना साधी परळी-मुंबई रेल्वे सुरू करता आली नाही, त्यांनी विकासाच्या गप्पा मारू नयेत. चिक्की खाण्याएवढे राष्ट्रवादी काँग्रेसला संपवणे सोपे वाटले का? असे धनंजय मुडेंनी परळीतील सभेत टीकास्त्र सोडले.
परळीत शनिवार २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्र पक्षाच्या महाआघाडीच्या संयुक्त सभेच्या व परिवर्तन यात्रेच्या तयारी संदर्भात परळी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना धनंजय मुंडेंनी पंकजा मुडेंवर टीका केली. तसेच परिवर्तन यात्रेची सभा यशस्वी करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी खांद्यावर घ्यावी, असे आवाहनही यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.
रायगड येथून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशिर्वाद घेऊन निघालेल्या परिवर्तन यात्रेचा समारोप प्रभु वैद्यनाथाच्या आशीर्वादाने होणार आहे. हे परिवर्तन केंद्रात, राज्यात घडवण्यासाठी आहे. त्यामुळे ही यात्रा केवळ आपल्या विरोधात आहे, असा गोड गैरसमज करून घेणाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला संपविण्याची भाषा सुरू केली आहे. त्यांनी सहज खाल्लेल्या 206 कोटी रुपयांच्या चिक्की खाण्याएवढे राष्ट्रवादी काँग्रेसला संपवणे सोपे आहे काय? कधी काळी भाजपाचा बालेकिल्ला असणारी परळी आज राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला झाली आहे. पुन्हा एकदा राज्याला या सभेच्या माध्यमातून परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद दाखवून देण्यासाठी शनिवारची सभा यशस्वी करणार असल्याचे मुंडेंनी कार्यकर्ता मेळाव्यात म्हटले.
केंद्रात सत्ता असतानाही ज्यांना परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग केंद्राचा बारा ज्योतिर्लिंगाच्या यादीत समावेश करता आला नाही, साधी परळी-मुंबई रेल्वे सुरू करता आली नाही, त्यांनी विकासाच्या गप्पा मारू नयेत. चिक्की खाण्याएवढे राष्ट्रवादी कॉंग्रेसला संपवणे सोपे वाटले का? #कार्यकर्ता_मेळावाpic.twitter.com/JcwC3d6hPx
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) February 21, 2019