पाऊस पोटभर मात्र बंधाऱ्यात पाणी घोटभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:23 AM2021-07-15T04:23:37+5:302021-07-15T04:23:37+5:30

शिरूर कासार : तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. तो पिकांना पोटभर झाला असल्याने शेतकरी समाधानी दिसून ...

It rained but the dam was full of water | पाऊस पोटभर मात्र बंधाऱ्यात पाणी घोटभर

पाऊस पोटभर मात्र बंधाऱ्यात पाणी घोटभर

Next

शिरूर कासार : तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. तो पिकांना पोटभर झाला असल्याने शेतकरी समाधानी दिसून येतो मात्र शहराच्या पश्चिमेला सिद्धेश्वर मंदिराच्या जवळच असलेल्या सिध्देश्वर बंधाऱ्यात मात्र अजूनही घोटभर पाणी जमा झाले नसल्याने मोठ्या पावसाशिवाय हा बंधारा भरणार नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे .

बसस्थानकाचा रस्ता चिखलाने माखला

शिरूर कासार : तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकाचा रस्ता चिखलाने माखलेला असल्याचे चित्र दिसून येत आहे. स्थानकात आत जाणाऱ्या व बाहेर पडणाऱ्या दोन्ही रस्त्यांवर पावसामुळे पाणी आणि चिखल तुडवत जावे लागत आहे. अशावेळी विशेषत्वाने महिला प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. पाण्यातून नको म्हणून बाजूने जाऊ लागले किंवा चिखलामुळे घसरून पडण्याची भीती वाटत आहे. दोन्ही रस्ते सध्या चिखलाने माखलेले चित्र दिसत असून याबाबत बस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रवाशांकडून बोलले जाते.

फोटो

दुसऱ्या दिवशीदेखील पावसाची हजेरी

शिरूर कासार : तालुक्यात मंगळवारी रात्रभर संततधार पाऊस पडला तर बुधवारीदेखील सकाळपासून पावसाचे आवर्तन सुरूच होते. पावसामुळे पुन्हा एकदा व्यवहार मंदावले असल्याचे दिसून येत होते .

शेतमजुरांना विसावा

शिरूर कासार : तालुक्यात गेली चार-पाच दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतात वापसा नसल्याने शेतकामे ठप्प झाली आहेत परिणामी शेतमजुरांना मात्र विसावा मिळाला असल्याचे दिसत आहे.

140721\img-20210714-wa0030.jpg

ऐश्वर्यसंपन्न संत भगवान बाबांच्या पादुका पंढरपुरात दाखल

Web Title: It rained but the dam was full of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.