पाणी बचतीसाठी जलसाक्षरता रुजविणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:33 AM2021-04-01T04:33:36+5:302021-04-01T04:33:36+5:30

बीड : बदलत्या काळात पाणी बचतीसाठी प्रत्येक नागरिकांमध्ये जलसाक्षरता आणणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पुणे येथील पाणी आणि पर्यावरण ...

It takes time to inculcate water literacy in order to save water | पाणी बचतीसाठी जलसाक्षरता रुजविणे काळाची गरज

पाणी बचतीसाठी जलसाक्षरता रुजविणे काळाची गरज

Next

बीड : बदलत्या काळात पाणी बचतीसाठी प्रत्येक नागरिकांमध्ये जलसाक्षरता आणणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पुणे येथील पाणी आणि पर्यावरण तज्ज्ञ डॉ. सतीश खाडे यांनी केले.

येथील महिला कला महाविद्यालयात गृहविज्ञान विभागाच्या वतीने २७ मार्च रोजी ‘महिला आणि जलसाक्षरता’ या विषयावर राष्ट्रीय वेबिनारमध्ये ते बोलत होते. अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. सविता शेटे यांची उपस्थिती होती.

डॉ. सतीश खाडे म्हणाले, जमिनीतील पाण्याची स्थिती चिंतेचा विषय असून, आपल्याकडील जलचक्र १९७२ पासून बिघडलेले आहे. पावसाची अनिश्चितता, लोकसंख्या वाढीमुळे पाण्याचा तसेच प्लास्टिकचा अधिक वापर वाढल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे ते म्हणाले.

या वेबिनारमध्ये त्यांनी निती आयोग, युएनओ यांचे संशोधनपर निष्कर्ष उपस्थितांसमोर मांडले.

युएनओच्या अहवालानुसार महिलांचा दररोज २० कोटी तास वेळ पाणी शोधणे आणि भरणे यासाठी जातो. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. ६० ते ७० टक्के महिलांना पाण्यामुळे आजार होतात. आईनंतर मुलीच्या वाट्याला पाणी भरण्याचे काम येत असल्याने महिलांमध्ये जलसाक्षरता असणे गरजेचे आहे. ६६ टक्के लोक शेतीवर अवलंबून असून, पाणी साक्षरतेमध्ये सुधारणा करण्यासाठी डॉ. खाडे यांनी अ‍ॅक्शन प्लॅन सांगून चर्चा केली.

सूत्रसंचालन डॉ. संध्या आयस्कर यांनी केले. या वेबिनारमध्ये विद्यार्थिनी, महिला, सामाजिक कार्यकर्ते, प्राचार्य, सहायक प्राध्यापक, शिक्षक यांनी सहभाग नोंदविला. डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी आभार मानले.

चौकट

पाणी बचतीसाठी शास्त्रीय भान गरजेचे

महिलांचा पाण्याशी जास्त संबंध असतो. निसर्गात मुबलक प्रमाणात पाणी आहे. परंतु, अप्रत्यक्ष पाण्याचा वापर विचार करायला लावणारा आहे. पाणी बचतीसाठी ‘लोकल टू ग्लोबल’ या संकल्पनेतून प्रत्येकाला शास्त्रीय भान येणे गरजेचे आहे, असे प्राचार्य डॉ. सविता शेटे यावेळी म्हणाल्या.

अशी होऊ शकते पाणी बचत

वैयक्तिक पाणी वाचविणे, फॅशनेबल कपड्यांचा वापर टाळणे, प्लास्टिक वापर टाळणे, पाण्याचे बजेट करणे, जलसाक्षरता उत्सव, नदी शुद्धीकरण, प्रत्येक घरावर वॉटर हार्वेस्टिंग, पावसाचे पाणी बोअरवेलमध्ये सोडणे अशा बाबी प्रत्येकाने केल्यास निश्चितच पाण्याची बचत करता येईल, असे शेवटी सतीश खाडे म्हणाले.

Web Title: It takes time to inculcate water literacy in order to save water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.