जिभेतील गोडव्यातूनच होतो राग, लोभ, मत्सराचा विनाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 11:57 PM2019-01-14T23:57:11+5:302019-01-14T23:57:46+5:30
जीभेतील गोडवा अंत:करणात जातो. अंत:करणातून माणसाची वृत्ती तयार होते. या वृत्तीतून विनम्रता, विनयता अंगी येते. परिणामी राग, लोभ, क्र ोध, मत्सर या तमोगुणांचा विनाश होऊन माणसाच्या अंगात सकारात्मकता वाढते. या सकारात्मक विचारसरणीतून जीवनाची सार्थकता प्राप्त होते, असा संदेश येथे पार पडलेल्या ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

भारतीय संस्कृतीत मकरसंक्र ांत या सणाला विशेष महत्त्व आहे. परस्परातील कटूता दूर होऊन स्नेहभाव वृद्धिंगत व्हावा, या उद्देशानेच तीळगूळ हे माध्यम आहे. म्हणूनच संक्र ांत हा गोड संदेश देणारा सण आहे. बाह्य गोडवा म्हणजे दांभिकता ही महत्त्वाची नसून अंतकरणातील गोडवा म्हणजे स्नेहभाव, प्रेम हे महत्त्वाचे आहे. आंतरिक गोडवा बाहेरच्या वातावरणाशी संवाद साधू शकतो. या संवादांतूनच इतरांविषयी प्रेम निर्माण होते, आदरभाव व्यक्त होतो. या आदरभावातूनच माणसांचे व्यक्तिमत्व फुलते. आपण लोकांना तिळाइतकं प्रेम दिलं की, आपल्याला डोंगराइतकं प्रेम मिळतं. यासाठी लोकांवर प्रेम करता आलं पाहिजे, असे तिवारी म्हणाले.
जिभेतील गोडव्यातूनच होतो राग, लोभ, मत्सराचा विनाश
रंगनाथ तिवारी : अंगात वाढते सकारात्मकता