टाळेबंदीत कापड विकणे महाग पडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:35 AM2021-04-09T04:35:51+5:302021-04-09T04:35:51+5:30
कडा : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या आदेशानुसार टाळेबंदीत शासन नियमांचा भंग करणाऱ्या कड्यातील दोन कापड दुकानदारांवर तहसीलदार राजाभाऊ कदम ...
कडा : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या आदेशानुसार टाळेबंदीत शासन नियमांचा भंग करणाऱ्या कड्यातील दोन कापड दुकानदारांवर तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी कारवाई करीत प्रत्येकी दोन हजाराची दंडात्मक कारवाई केली.
शासनाच्या टाळेबंदीत देखील दुकाने उघडून जिल्हाधिका-यांच्या आदेशाची सर्रास पायमल्ली करीत कापड दुकाने उघडी असल्याचे तहसीलदार राजाभाऊ कदम यांना गुरुवारी दुपारी पेट्रोलिंग करताना दिसून आले. मुख्य बाजारपेठेतील दोन कापड दुकानदारांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावून दुकानांना सील करण्याचे सांगितले. तसेच यापुढे टाळेबंदी काळात दुकानदारी करताना आढळून आल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले आहेत. आष्टीच्या तहसीलदारांनी कारवाई केल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. यावेळी तहसीलदार राजाभाऊ कदम, ना. तहसीलदार प्रदीप पांडूळे, फौजदार कोरडे, ग्रामसेवक आबासाहेब खिलारे, तलाठी औदकर, मोहन पाचांगे यांच्यासहित महसूल आणि स्थानिक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.
फोटो काढले म्हणून पत्रकारांना अरेरावी
कड्यात गुरुवारी दुपारी तहसीलदार राजाभाऊ कदम हे स्वत: पेट्रोलिंग करीत होते. यावेळी दुकानदार टाळेबंदीत अनाधिकृतपणे दुकानदारी करताना दिसले. त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. मात्र यावेळी स्थानिक प्रशासन व पत्रकारांनी दुकानाचे फोटो का काढले, म्हणून दुकानदाराच्या सुपुत्राने पत्रकारांनाच नाहक अरेरावी केली. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली.
===Photopath===
080421\20210408_192726_14.jpg