ग्राहकांना हाॅटेलमध्ये जेवण देणे पडले महाग; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:34 AM2021-04-07T04:34:49+5:302021-04-07T04:34:49+5:30

शासनाने साथ रोग नियंत्रणात आणण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसायावर निर्बंध लागु केले होते. त्यामध्ये हाॅटेल, खानावळ यांना केवळ ...

It was expensive to serve meals to customers in hotels; Filed a crime | ग्राहकांना हाॅटेलमध्ये जेवण देणे पडले महाग; गुन्हा दाखल

ग्राहकांना हाॅटेलमध्ये जेवण देणे पडले महाग; गुन्हा दाखल

Next

शासनाने साथ रोग नियंत्रणात आणण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसायावर निर्बंध लागु केले होते. त्यामध्ये हाॅटेल, खानावळ यांना केवळ पार्सल सुविधा चालु ठेवण्यासाठी मुभा दिली होती. यात शहरातील बहुतांश व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते . ६ एप्रिल रोजी दुपारी बाराच्या सुमारास नवीन बसस्थानका समोरील गायत्री हाॅटेलमध्ये ग्राहकांना टेबलावर बसून जेवणाची सुविधा दिली जात होती. एका टेबलवर गणेश महादेव नामदास रा.माजलगाव, शेख रहिम शेख बाबू रा.अशोक नगर व किसन प्रभाकर नाईकनवरे रा.सावरगाव हे ग्राहक जेवण करत होते. हाॅटेल मालक लक्ष्मण हिरारामजी चौधरी रा.औरंगाबाद यांच्याविरुद्ध तर शहराच्या बायपासरोडवरील साई हाॅटेल मालक परमेश्वर मुकिंदा घेणे (रा.शाहुनगर) याने आपल्या हाॅटेलमध्ये ग्राहकांना टेबल व खुर्चीवर बसून चहाची व्यवस्था केली होती. यामुळे या दोन हाॅटेल मालकावर जिल्हाधिकारी यांचे आदेश व आपत्ती व्यवस्थापन कायदा महाराष्ट्र राज्य अधिनियमचे उल्लंघन केल्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: It was expensive to serve meals to customers in hotels; Filed a crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.