‘जय जिजाऊ, जय शिवराय’; घोषणांनी दणाणले बीड शहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:18 AM2018-01-13T00:18:26+5:302018-01-13T00:19:40+5:30
डोक्याला भगवे फेटे... गळ्यात रूमाल... उंच फडकणारे झेंडे आणि शिस्तबद्ध रॅलीने बीडशहर भगवेमय झाले होते. निमित्त होते माँ जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित मिरवणुकीचे. ‘जय जिजाऊ, जय शिवराय’ अशा विविध घोषणांनी शहर दणाणून गेले होते. बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी सामाजिक कार्यक्रम घेऊन राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : डोक्याला भगवे फेटे... गळ्यात रूमाल... उंच फडकणारे झेंडे आणि शिस्तबद्ध रॅलीने बीडशहर भगवेमय झाले होते. निमित्त होते माँ जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित मिरवणुकीचे. ‘जय जिजाऊ, जय शिवराय’ अशा विविध घोषणांनी शहर दणाणून गेले होते. जिल्ह्यात ठिकठिकाणी सामाजिक कार्यक्रम घेऊन राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले.
बीड शहरात सकाळी पाण्याच्या टाकीजवळ कार्यक्रम घेण्यात आले. सुरूवातीला जिजाऊ वंदना घेण्यात आली. त्यानंतर माँ जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आ.विनायक मेटे, आ.सुधीर पारवे, माजी आ.सुनील धांडे, माजी आ.राजेंद्र जगताप, नगराध्यक्ष डॉ.भारभूषण क्षीरसागर, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, अशोक हिंगे, रिपाइचे पप्पू कागदे, राजेंद्र मस्के, संदीप क्षीरसागर, प्रभाकर कोलंगडे, सीए. बी.बी.जाधव, जयश्री मस्के, पोलीस उपअधीक्षक सुधील खिरडकर, कुंदा काळे, मनविसेचे शैलेश जाधव, राहुल वाईकर, रवि शिंदे, रमेश चव्हाण, रविंद्र्र कदम, प्रभाकर पोपळे, सुभाष सपकाळ, अमर नाईकवाडे, सुभाष सपकाळ, मंगेश पोकळे, गोपाळ धांडे, अशोक लोढा, पंकज चव्हाण, अशोक तांगडे, डॉ.प्रमोद शिंदे, प्रा.राजेश भुसारी, सागर बहिर, महेश धांडे, जयश्री विधाते, रणजित बनसोडे, पिंटू पोपळे, मळीराम यादव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अभिवादन कार्यक्रमानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
महिलांची उपस्थिती
सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज संकुलाजवळून मिरवणूकील सुरूवात झाली. यामध्ये फेटेधारी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
मिरवणुकीत देखावे व विविध खेळांचे प्रकार सादर करण्यात आले.
रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरूच होती. पोलिसांकडून ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात
आला होता.