जय महेश साखर कारखान्यासमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:38 AM2018-10-11T00:38:02+5:302018-10-11T00:38:31+5:30
ऊस गाळपास देऊन दहा महिने होऊनही जय महेश साखर कारखान्याने अद्याप पैसे दिले नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. थकीत पैसे तात्काळ देण्यात यावेत, यासाठी शेतकऱ्यांनी कारखान्याच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरु केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : ऊस गाळपास देऊन दहा महिने होऊनही जय महेश साखर कारखान्याने अद्याप पैसे दिले नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. थकीत पैसे तात्काळ देण्यात यावेत, यासाठी शेतकऱ्यांनी कारखान्याच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरु केले. पैसे मिळेपर्यंत माघार घेणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. कारखान्यातून बाहेर जाणारी साखरही अडविल्याने काहीवेळ गोंधळ उडाला होता.त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.
पवारवाडी येथील जय महेश या खाजगी कारखान्याला मागील वर्षी शेतकºयांनी ऊस गाळपासाठी दिला होता. कारखाना प्रशानाने डिसेंबर २०१७ पर्यंतचे शेतकºयांना गाळप ऊसाचे पैसे दिले; परंतु जानेवारी २०१८ पासून शेतकºयांचे पैसे थकविले आहेत. दहा महिने होऊनही अद्याप शेतकºयांना ऊसाचे पैसे न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ऊस बिलाचे थकित पैसे तात्काळ देण्यात यावेत, या मागणीसाठी मंगळावरपासून गेवराई, वडवणी, धारूर तालुक्यातील शेकडो शेतकºयांनी कारखान्याच्या मुख्य गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरु केले. कारखान्याकडे पावणेदोन लाख क्विंटल साखर (जवळपास ५६ कोटी रुपयांची) शिल्लक असून ही साखर बाहेर नेण्यात येत आहे. यामुळे बुधवारी सकाळी कारखान्यातून बाहेर जाणारी साखर शेतकºयांनी अडविल्याने काहीकाळ गोंधळ उडाला होता. यामुळे कारखानास्थळावर मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कारखान्याकडे शेतकºयांचे जवळपास ४० कोटी रुपये थकले असून हे पैसे मिळेपर्यंत माघार घेणार नसल्याचा पवित्रा शेतकºयांनी घेतला आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत शेतकºयांचे पैसे दिले नाही तर एकही साखरेची गाडी बाहेर जाऊ दिली जाणार नाही. हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना, पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी दिला
या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष माणिकराव कदम, कार्याध्यक्ष गजानन बंगाळे, जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, गेवराई पंचायत समितीच्या सदस्या पूजा मोरे, राजू गायके, सुरेश काळे, रोहिदास चव्हाण, अर्जुन सोनवणे, अशोक मोरे, माजी सभापती भाजपचे नितीन नाइकनवरे यांनी सहभाग घेऊन आंदोलनाला पाठींबा दिला.
शिवसेनेचेही पुण्यात झोपडी आंदोलन
४जय महेश कारखान्याकडील उसबिलाचे थकित पैसे मिळावेत, या मागणीसाठी शिवसेनेने बुधवारपासून पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर झोपडी थाटून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन मुळूक, आप्पासाहेब जाधव यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले आहेत.