मराठा आरक्षणासाठी नागपूरच्या वाण धरणात जल आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 05:40 PM2023-09-09T17:40:12+5:302023-09-09T17:41:15+5:30

परळी तालुक्यातील नागापूर येथील वाण धरणाच्या काठावर गुरुवारपासून धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

Jal agitation in Nagpur's Wan dam for Maratha reservation | मराठा आरक्षणासाठी नागपूरच्या वाण धरणात जल आंदोलन

मराठा आरक्षणासाठी नागपूरच्या वाण धरणात जल आंदोलन

googlenewsNext

- संजय खाकरे
परळी(बीड):
मराठा समाजास आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी शनिवारी मराठा क्रांती मोर्चा व मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने नागापूरच्या वाण धरणाच्या पाण्यात उतरून जल आंदोलन केले. मराठा समाजास आरक्षण द्यावे, जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे आंदोलकावर करणाऱ्या लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी या मागणीसाठी गुरुवारपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने नागापूरच्या वाण धरणावर धरणे आंदोलन सुरू आहे. 

परळी तालुक्यातील नागापूर येथील वाण धरणाच्या काठावर गुरुवारपासून धरणे आंदोलन करण्यात येत आहे. एक मराठा लाख मराठा, मराठा समाजास आरक्षण मिळालेच पाहिजे,  आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा देण्यात आल्या. मराठा समाजास आरक्षण जाहीर न  केल्यास सामूहिक जलसमाधी घेण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चा चे सद्स्य अमित घाडगे यांनी यावेळी दिला आहे. मराठा समाजास आरक्षण देण्यास सरकार चालढकल करीत असल्याचा आरोप यावेळी कार्यकर्ते संतोष शिंदे, सेवकराम जाधव यांनी केला आहे.  यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असून धरण्याच्या पाण्यात बोटी ही  सोडण्यात आल्या आहेत.

Web Title: Jal agitation in Nagpur's Wan dam for Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.