३ खुनांनी जालना जिल्हा हादरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:05 AM2019-01-20T00:05:52+5:302019-01-20T00:06:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : येथील नगर परिषदेतील भाजपचे नगरसेवक विजय शेषेराव जोगदंड (वय ३४) यांच्या निर्घृण हत्येनंतर शांततेसाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : येथील नगर परिषदेतील भाजपचे नगरसेवक विजय शेषेराव जोगदंड (वय ३४) यांच्या निर्घृण हत्येनंतर शांततेसाठी प्रसिद्ध असणारे अंबाजोगाई शहर स्तब्ध झाले आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजता परळी वेस परिसरातील प्राणघातक हल्ल्यात जोगदंड यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी भावकीतील सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून भावाचे अनैतिक संबंध नगरसेवक जोगदंड यांना भोवले असल्याचे तपासातून पुढे आले आहे. यात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, अद्यापही चौघे फरार आहेत.
विजय यांचा लहान भाऊ नितीन यांच्या फिर्यादीनुसार दोन वर्षापूर्वी त्याचे आणि भावकीतील एका महिलेचे अनैतिक संबंध होते. या कारणामुळे भगवान दत्तू जोगदंड आणि त्याची मुले नितीनवर चिडून होते. शुक्रवारी रात्री ८ वाजता नितीन परळी वेस परिसरातील समता नगरमध्ये जाणाऱ्या कमानीजवळ थांबला असताना राज उर्फ रांजन्या भगवान जोगदंड, मनोज उर्फ मन्या भगवान जोगदंड, विजय भगवान जोगदंड, अर्जुन भगवान जोगदंड, मालू भगवान जोगदंड आणि करण भगवान जोगदंड हे सहा सख्खे भाऊ तलवार, गुप्ती आणि कोयता घेऊन तिथे आले. शिवीगाळ करत मालूने नितीनवर गुप्तीने वार केला. दरम्यान, भावाला मारहाण होत असल्याचे माहीत झाल्याने नगरसेवक विजय जोगदंड यांनी तिथे धाव घेतली आणि हल्लेखोरांची समजूत घालू लागले. त्याचवेळी राज याने तलवारीने आणि करण याने कोयत्याने विजय यांच्या डोक्यात, कानावर, गालावर आणि हातावर सपासप वार केले. यात विजय जोगदंड गंभीर जखमी झाले. यावेळी नितीनने जीवाच्या भीतीने तिथून पळ काढला. विजय जोगदंड रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपीही घटनास्थळाहून पसार झाले. त्यानंतर गल्लीतील लोकांनी विजय यांना स्वाराती रुग्णालयात दाखल केले. परंतु, तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, उपअधीक्षक सुरेश गायकवाड, पो.नि. सोमनाथ गीते यांनी रुग्णालय आणि घटनास्थळी भेट दिली आणि तातडीने तपास सुरु केला. घटनास्थळाहून जीवाच्या भीतीने पळालेला नितीन जखमी अवस्थेत मध्यरात्रीपर्यंत एका खदानीत लपून बसला होता. त्यानंतर काही व्यक्तींनी त्याला शोधून काढले आणि धीर देत पोलीस ठाण्यात घेऊन आले. रात्री उशिरा नितीन जोगदंड याच्या फिर्यादीवरून सहा आरोपींवर अंबाजोगाई शहर ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.
दरम्यान, हल्ल्याचे वृत्त समजताच रुग्णालय परिसरात प्रचंड गर्दी जमली. विजय जोगदंड यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात आई, चार भाऊ, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.
आरोपीच्या शोधासाठी पाच पथके
घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करून घटनास्थळाहून हल्ल्यात वापरलेली शस्त्रे जप्त केली. रात्रीतून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून चार आरोपी अद्याप फरार आहेत. आरोपींच्या शोधासाठी पाच पथके तयार करण्यात आली आहेत. कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी शहरात प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
नगरसेवक पदाची उल्लेखनीय कारकीर्द
दोन वषार्पूर्वी अतिशय सामान्य घरातील विजय जोगदंड हे स्वत:च्या जनसंपर्काच्या जोरावर भाजपच्या तिकिटावर नगरसेवकपदी निवडून आले होते. नगर पालिका सभागृहात स्वच्छतेच्या प्रश्नावर आणि प्रभागातील अडचणीसाठी त्यांनी नेहमीच आवाज उठविला. काही प्रश्नांवर त्यांनी थेट जिल्हाधिकाºयांकडेही तक्रारी केल्या होत्या. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात देखील त्यांचा पुढाकार असे.