‘जॅमर’ ठेवणार वीज चोरांवर ‘वॉच’

By Admin | Published: March 1, 2017 01:14 AM2017-03-01T01:14:38+5:302017-03-01T01:16:15+5:30

बीड वीज चोरीला आळा घालण्यासाठी अद्यापपर्यंत एक ना अनेक युक्त्या लढवल्या आहेत. असे असून देखील बीड अर्बनमध्ये ५५ टक्के वीज चोरीचे प्रमाण असल्याचे निदर्शनास आले आहे.

'Jammer' will power 'thief' on thieves | ‘जॅमर’ ठेवणार वीज चोरांवर ‘वॉच’

‘जॅमर’ ठेवणार वीज चोरांवर ‘वॉच’

googlenewsNext

राजेश खराडे बीड
वीज चोरीला आळा घालण्यासाठी अद्यापपर्यंत एक ना अनेक युक्त्या लढवल्या आहेत. असे असून देखील बीड अर्बनमध्ये ५५ टक्के वीज चोरीचे प्रमाण असल्याचे निदर्शनास आले आहे. या करिता गेल्या १० दिवसांपासून इलेक्ट्रॉनिक ‘जॅमर’च्या माध्यमातून मिटरची तपासणी करुन वीज चोरी उघडकीस आणली जात आहे. या माध्यमातून १०० ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे.
बीड विभागाकडे दिवसेंदिवस थकबाकीचा आकडा फुगत आहे. अशातच वीज चोरीचे प्रमाण देखील वाढत असल्याने वसुलीस अडथळे निर्माण होत आहेत. मिटरमधील वायरांची आलटपालट, मिटरवर चुंबक ठेवणे शिवाय वीज वाहिनीवरील वायर थेट मिटरला जोडून वीज चोरी केली जात आहे. यामधून बीड अर्बनला ५० टक्के तोटा सहन करावा लागत आहे. वीज चोरी निष्पन्न करण्यासाठी ‘जॅमर’चा वापर केल्याने मिटर वापराची विस्तृत माहिती समोर येऊ लागली आहे. यामधून बीड अर्बनमधील १०० जणांवर कारवाई केली आहे. वीज चोरी निदर्शनास आल्यास वाढीव अ‍ॅम्पियरचे दर आकारले जाणार आहे. शिवाय महावितरण वीज चोरीचा तोटा सहन न करता आगामी काळात शहरात भारनियमन लादण्याच्या तयारीत आहे. ‘जॅमर’च्या माध्यमातून वीज चोरी ग्राहकांना आळा बसण्याच्या अनुषंगाने महावितरणने पाऊल उचलले आहे. बीड अर्बनसह ग्रामीण भागातही याचा वापर केला जाणार आहे. सद्यस्थितीला मार्चच्या अनुषंगाने महावितरणची वसुली मोहीम सुरू आहे. वसुली बरोबरच वीज चोरांवर कारवाईचे उद्दिष्ट बीड अर्बनने समोर ठेवले आहे. त्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

Web Title: 'Jammer' will power 'thief' on thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.