जीप पुलाखाली कोसळली, धारूरचा तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:22 AM2021-07-19T04:22:11+5:302021-07-19T04:22:11+5:30

लोकमत न्युज नेटवर्क धारूर : केज तालुक्यातील चंदनसावरगावजवळ असलेल्या पुलावरून जीप कोसळल्याने झालेल्य अपघातात जीपमधील तरुण कृष्णा सोनटक्के (३२) ...

The jeep crashed under the bridge, killing a young man from Dharur | जीप पुलाखाली कोसळली, धारूरचा तरुण ठार

जीप पुलाखाली कोसळली, धारूरचा तरुण ठार

Next

लोकमत न्युज नेटवर्क

धारूर : केज तालुक्यातील चंदनसावरगावजवळ असलेल्या पुलावरून जीप कोसळल्याने झालेल्य अपघातात जीपमधील तरुण कृष्णा सोनटक्के (३२) हा जागीच ठार झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली.

धारूर येथील रहिवासी कृष्णा सोनटक्के हा रविवारी पहाटे जीपने (क्र. एमएच ४४ जी ८३१३) अंबाजोगाईकडे जात होते. दरम्यान ताबा सुटल्याने केज रस्त्यावर चंदनसावरगावजवळ एका पुलावरून जीप खाली कोसळली. अपघातात कृष्णा सोनटक्के जागीच ठार झाला. युसफवडगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. हा अपघात झाल्याचे समजताच घटनास्थळी तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रविवारी दुपारी कृष्णावर धारूर येथील पोलीस ठाण्यामागील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

180721\1437-img-20210718-wa0005.jpg~180721\anil mhajan_img-20210718-wa0057_14.jpg

स्कॉर्पिओ पुलावरून खाली कोसळून झालेल्या अपघातातील मयत कृष्णा सोनटक्के~

Web Title: The jeep crashed under the bridge, killing a young man from Dharur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.