निवडणूक निकाल ऐकण्यास बीडला निघालेल्या उमेदवारांच्या जीपला अपघात; १ ठार तर ७ जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 03:15 PM2017-12-27T15:15:30+5:302017-12-27T15:15:48+5:30

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी बीडला निघालेल्या उमेदवारांची जीप बीड- मांजरसुंंबा रस्त्यावर उलटली. यात नेकनूरच्या विद्यमान सरपंचांचे बंधू शेख वशीद अन्वर (३४) यांचा मृत्यू झाला तर इतर सात जण जखमी आहेत.

Jeep gets injured due to election results; 1 killed and 7 injured | निवडणूक निकाल ऐकण्यास बीडला निघालेल्या उमेदवारांच्या जीपला अपघात; १ ठार तर ७ जखमी 

निवडणूक निकाल ऐकण्यास बीडला निघालेल्या उमेदवारांच्या जीपला अपघात; १ ठार तर ७ जखमी 

googlenewsNext

नेकनूर (बीड) : ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी बीडला निघालेल्या उमेदवारांची जीप बीड- मांजरसुंंबा रस्त्यावर उलटली. यात नेकनूरच्या विद्यमान सरपंचांचे बंधू शेख वशीद अन्वर (३४) यांचा मृत्यू झाला तर इतर सात जण जखमी आहेत. ही घटना आज सकाळी पावणे दहा वाजता घडली.

बीड तालुक्यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायींपैकी एक नेकनूर ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी मतदान झाले. बुधवारी बीड तहसील कार्यालयात मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत. भाजपचे विद्यमान सरपंच अर्शद अन्वर या सरपंचपदाच्या उमेदवार आहेत. बुधवारी सकाळी निकाल ऐकण्यासाठी अर्शद अन्वर त्यांचे बंधू शेख वशीद व सदस्यपदाचे काही उमेदवार जीप (क्र. एमएच ४४ जी- २१८) मधून बीडला येत होते. 

प्रमिलादेवी महाविद्यालयासमोर स्टेअरींगवरील ताबा सुटल्याने जीप रस्त्याखाली उतरली. शेतात ६० फूट अंतरावर जाऊन जीप उलटली. वशीद अन्वर स्वत: जीप चालवत होते. जीपखाली दबून त्यांचा जागीच मृत्यू झाला. सरपंच अर्शद अन्वर, मयूर काळे, बिभीषण शिंदे, अरशमीद सय्यद, रशीद पठाण, सलमान सय्यद व गुड्डू काझी यांचा जखमींत समावेश आहे. त्या सर्वांना खासगी वाहनातून तातडीने बीडला उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

Web Title: Jeep gets injured due to election results; 1 killed and 7 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.