बंकटस्वामी महाविद्यालयात संयुक्त जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:28 AM2021-01-15T04:28:05+5:302021-01-15T04:28:05+5:30
कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते म्हणून शिवव्याख्याते सुसेन नाईकवाडे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. शिवाजी मोरे होते. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. बी. ...
कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते म्हणून शिवव्याख्याते सुसेन नाईकवाडे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. शिवाजी मोरे होते. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. बी. जी. काळे उपस्थित होते. यावेळी प्रतिमापूजन करून अभिवादन झाले. विद्यार्थिनी वैष्णवी तिपाले व श्रावणी माने यांनी जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली.
महाविद्यालयातील माजी विद्यार्थी नीलेश मोहिते व पत्नी वैष्णवी मोहिते हे अनाथ मुलांसाठी रामनगर येथे स्नेहसावली आश्रम चालवितात. त्यांच्या कार्याची दखल घेत सत्कार करण्यात आला. महिला कक्षाच्या सदस्या प्रा. वर्षा भोसले यांच्यातर्फे वैष्णवी मोहिते यांना साडी शाल व आश्रमासाठी दोन हजार रुपये देऊन त्यांचा सन्मान केला. यानंतर वैष्णवी भांड या विद्यार्थिनीने राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. यानंतर सुसेन नाईकवाडे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवनातील अनेक संघर्षाचे वर्णन केले.
सूत्रसंचालन विद्यार्थिनी वैष्णवी दीपाली व श्रावणी माने यांनी केले तर आभार रासेयो कार्यक्रमाधिकारी अरुण दैतकार यांनी मानले. रासेयो कार्यक्रमाधिकारी व महिला कक्षाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.