स्मार्ट आवरगावची वाटचाल महाराष्ट्राला आदर्श ठरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:37 AM2021-09-05T04:37:08+5:302021-09-05T04:37:08+5:30

सीईओ अजित पवार : दोन तास थांबून ग्रामस्थांशी साधला संवाद धारूर : ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील काही गावांनी आपली एक ...

The journey of Smart Awargaon will be ideal for Maharashtra | स्मार्ट आवरगावची वाटचाल महाराष्ट्राला आदर्श ठरेल

स्मार्ट आवरगावची वाटचाल महाराष्ट्राला आदर्श ठरेल

googlenewsNext

सीईओ अजित पवार : दोन तास थांबून ग्रामस्थांशी साधला संवाद

धारूर : ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील काही गावांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अगदी त्याचप्रमाणे आवरगावही वाटचाल करत आहे. त्यामुळे भविष्यात आवरगाव महाराष्ट्रासाठी नक्कीच आदर्श ठरेल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी व्यक्त केला. धारूर तालुक्यातील आवरगाव या स्मार्टग्रामला भेट देत ग्रामपंचायतने केलेल्या कामाचे पवार यांनी कौतुक केले. यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांची उपस्थिती होती. सीईओ पवार दोन तास आवरगावमध्ये होते. यावेळी त्यांनी चांगले काम करणाऱ्या आवरगावच्या सरपंच पद्मिनीबाई जगताप, अमोल जगताप, ग्रामसेवक बाळासाहेब झोंबाडे, अंगणवाडीताई नीता नखाते, आशाताई अंजली नखाते यांची प्रशंसा केली. यावेळी पवार यांनी संपूर्ण गावाची पाहणी केली. गावातील नियोजन पाहून त्यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले. गावाला मिळालेला पुरस्कार आणि त्या पुरस्काराची रक्कमही तत्काळ मिळवून देऊ, असे आश्वासन यावेळी पवार यांनी ग्रामस्थांना दिले. यावेळी ज्येष्ठ नागरिक सर्जेराव जगताप, डिंगाबर नखाते, अजित जगताप, लालासाहेब जगताप, बालासाहेब नखाते, कुलदीप जगताप, पुष्पराज जगताप, महादेव जगताप, राहुल नखाते, राहुल जगताप, महेश नखाते, मनोज नखाते, विनोद नखाते, बळवंत नखाते, सुरेंद्र नखाते, उत्तम लोखंडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Template

Image Attachment

Photo Manager

Social Media

Metadata

Attach Document

Translate

Backup

Agency

QrCode

Attch Audio/Video

030921\063803_2_bed_12_03092021_14.jpeg

आवरगाव

Web Title: The journey of Smart Awargaon will be ideal for Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.