बस सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:33 AM2021-02-10T04:33:59+5:302021-02-10T04:33:59+5:30
शेतीला पाणी मिळेना बीड : नेकनूर, येळंबघाट, चौसाळा या भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठा केला ...
शेतीला पाणी मिळेना
बीड : नेकनूर, येळंबघाट, चौसाळा या भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठा केला जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. शेतीला पाणी देण्याचे हे दिवस असल्याने वारंवार वीज खंडित होत असल्याने अडचण येत आहे.
साहित्य रस्त्यावरच
अंबाजोगाई : शहरात ठिकठिकाणी बांधकामे सुरू आहेत. बांधकाम करताना लागणारे वाळू, खडी, विटा हे बांधकाम साहित्य सातत्याने रस्त्यावरच टाकण्यात येते. परिणामी शहरवासीयांना ये-जा करताना याचा त्रास सहन करावा लागतो.
सुविधांचा अभाव
नेकनूर : येथील आठवडी बाजार दर रविवारी भरतो. लाॅकडाऊन कालावधीत हा बाजार बंद होता. निर्बंध उठल्यानंतर पुन्हा एकदा बाजार भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, बाजार सुरू झाला असून, असुविधेमुळे भाजीविक्रेत्यांची गैरसोय होत आहे.
अवैध वाळू वाहतूक
गेवराई : शहरासह परिसरामध्ये आजही पोलीस व महसूल विभागाची नजर चुकवून वाळू माफिया दुप्पट दर आकारात अनधिकृतपणे वाळू वाहतूक करीत असल्याचे दिसत आहे.