नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने कडेकोट सुरक्षा व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 11:17 PM2019-09-28T23:17:23+5:302019-09-28T23:17:32+5:30
महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री योगेश्वरी देवीचा दसरा महोत्सव २९ सप्टेंबर ते ८ आॅक्टोबर या कालावधीत संपन्न होत आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री योगेश्वरी देवीचा दसरा महोत्सव २९ सप्टेंबर ते ८ आॅक्टोबर या कालावधीत संपन्न होत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंदिर सुरक्षा व्यवस्थेसाठी प्रशासनाच्या वतीने ठोस उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.
८ वर्षापूर्वी योगेश्वरी देवीच्या अंगावरील दागिन्यांची झालेली चोरीवरून महाराष्ट्रात उठलेले वादळ तसेच दागिन्यांच्या तपासाबाबत अजूनही असलेली संभ्रमावस्था. अशा घटना पुन्हा घडू नयेत याची खबरदारी घेत यावर्षी दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था आखण्यात आली आहे. मंदिर परिसरात १५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. तसेच पोलिस बंदोबस्तासाठी ६० पोलिस तीन अधिकारी यांची विविध पथके स्थापन करण्यात आली आहे. तसेच प्रवेशद्वारात सुरक्षेसाठी दोन धातूशोधक यंत्र बसविले आहेत. चिडीमार पथक, आरोग्यसुविधा देणारी पथके महोत्सवाच्या निमित्ताने स्थापन केली आहेत. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोेर, पो.नि. सिद्धार्थ गाडे, तहसीलदार तथा योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष संतोष रूईकर, सचिव भगवानराव शिंदे, विश्वस्त कमलाकर चौसाळकर, गिरीधारीलाल भराडिया, उल्हास पांडे, प्रा. अशोक लोमटे, पूजा कुलकर्णी, पृथ्वीराज साठे, अॅड. शरद लोमटे, मुख्य पुजारी सारंग पुजारी, यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. मंदिर परिसरातील स्वच्छता व विविध सोयीसुविधा भक्तांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे तहसीलदार संतोष रूईकर म्हणाले. तसेच दर्शनासाठी येणाºया भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. दर्शनासाठी स्वतंत्र रांगा तसेच मंदिर परिसरात स्वच्छतेसाठी स्वच्छता पथक नेमण्यात आले आहेत. भाविकांना सर्व सेवा व सुविधा देवल कमिटीच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.