केज उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांचा राज्यव्यापी संपास पाठिंबा; काळ्या फिती लाऊन केले काम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 06:57 PM2018-08-08T18:57:27+5:302018-08-08T18:58:48+5:30

राज्यात चालु असलेल्या कर्मचारी संघटनेच्या संपास उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी पाठिंबा दिला. 

Kaij Deputy District Hospital officials and employees supports state strike | केज उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांचा राज्यव्यापी संपास पाठिंबा; काळ्या फिती लाऊन केले काम 

केज उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांचा राज्यव्यापी संपास पाठिंबा; काळ्या फिती लाऊन केले काम 

googlenewsNext

केज (बीड ) : राज्यात चालु असलेल्या कर्मचारी संघटनेच्या संपास उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी पाठिंबा दिला. 

राज्यातील कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी तीन दिवसीय संप पुकारण्यात आला आहे. यात केज येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, लिपिक व शिपायांनी पाठिंबा दिला. तसेच यावेळी त्यांनी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध व्यक्त केला.
कर्मचाऱ्यांनी पाठिंब्याबाबतचे पत्र वैद्यकीय अधीक्षक यांना दिले. पत्रावर वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुणा दहिफळे, डॉ. नयना सिरसट, डॉ. वैशाली पोतदार,डॉ. करपे , डॉ. चाटे , डॉ. वैशाली क्षीरसागर, कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष ज्योती आरकडे, सविता भोपळे, कविता कराड, लिपीक तानाजी तपसे आदींच्या स्वाक्षरी आहेत. 

Web Title: Kaij Deputy District Hospital officials and employees supports state strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.