केज येथे आमदार कदम यांच्या प्रतिमेची शिवसेने काढली गाढवावरून धिंड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 05:09 PM2018-09-06T17:09:57+5:302018-09-06T17:12:41+5:30

संतप्त आंदोलकांनी आमदार कदम यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करत त्यांच्या प्रतिमेची गाढवावरून धिंड काढली. 

In kaij Shivsena activist did Dhind of MLA Kadam's image | केज येथे आमदार कदम यांच्या प्रतिमेची शिवसेने काढली गाढवावरून धिंड 

केज येथे आमदार कदम यांच्या प्रतिमेची शिवसेने काढली गाढवावरून धिंड 

googlenewsNext

केज (बीड ) : भाजपचे आमदार राम कदम यांनी दहीहंडी कार्यक्रमात मुली बद्दल अपशब्द काढल्या प्रकरणी केज तालुका शिवसेनेने आज जोडोमारो आंदोलन केले. संतप्त आंदोलकांनी आमदार कदम यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करत त्यांच्या प्रतिमेची गाढवावरून धिंड काढली. 

भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी मुंबई येथे दहीहंडी कार्यक्रमात बोलताना लग्नास नकार देणार्‍या मुलीस पळवून आणून लग्न लावून देवू  असे आक्षेपार्ह विधान केले. या वक्तव्याचा आज शिवसेनेच्या तालुका शाखेने निषेध केला. यानंतर आंदोलकांनी कदम यांच्या प्रतिमेची गाढवावरून शहरात धिंड काढली. तहसील कार्यालयासमोर आंदोलकांनी प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले. 

आंदोलकांनी नायब तहसीलदार शेख यांना निवेदन देऊन आमदार कदम यांची आमदारकी रद्द करून त्यांना तुरुंगात टाकण्याची मागणी केली. यावेळी तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे, शहर प्रमुख बालु पवार, उप तालुका प्रमुख अनिल बडे, युवासेना तालुका प्रमुख अरविंद थोरात, अभिजीत घाटुळ,  प्रकाश केदार, राहुल घोळवे, संग्राम चाटे , विनोद राऊत, मंगेश पवार,कॄष्णा केदार आदींची उपस्थिती होती. 

Web Title: In kaij Shivsena activist did Dhind of MLA Kadam's image

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.