कपिलेश्वर मंदिराचे कलशारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:32 AM2021-08-29T04:32:13+5:302021-08-29T04:32:13+5:30

... शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी करावी शिरूर कासार : पीक नोंदणीत आता आमूलाग्र बदल झालेला असून ती नोंदणी आता शेतकऱ्यांनी ...

Kalsharohan of Kapileshwar temple | कपिलेश्वर मंदिराचे कलशारोहण

कपिलेश्वर मंदिराचे कलशारोहण

Next

...

शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी करावी

शिरूर कासार : पीक नोंदणीत आता आमूलाग्र बदल झालेला असून ती नोंदणी आता शेतकऱ्यांनी करायची आहे. जेणेकरून पीकनोंदणीत सत्यता येईल. त्यासाठी ई-पीक नोंदणी आपल्या मोबाईल ॲपवर करावी, विमा अनुदान नुकसान भरपाई यांपासून वंचित राहू नये म्हणून तातडीने ई-पीक नोंदणी करून घेण्याचे आवाहन कृषी विभाग व महसूल विभागाकडून करण्यात आले आहे.

...

शहरातील गवतावर तणनाशक फवारणी करावी

शिरूर कासार : शहरात ठिकठिकाणी मोकळ्या जागी अनाठायी गवत उगवले आहे. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढून थंडी-तापाच्या रुग्णसंखेत वाढ होत आहे. या गवतावर तणनाशकाची फवारणी केल्यास डासांचा उपद्रव काही अंशी कमी होईल. याकरिता नगरपंचायतीने तणनाशकाची फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.

....

अर्धा पावसाळा संपला तरी सिंदफना कोरडीच

शिरूर कासार : शिरूरची जीवनदायिनी समजली असलेल्या सिंदफना नदी अर्धा पावसाळा संपला तरी कोरडीठाक असल्याचे चित्र कायम आहे. मोठा पाऊस झाल्याशिवाय सिंदफनेचे पारणे फिटणार नाही. यामुळे शेतकरी सध्या मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

....

पावसामुळे शेतात गवत फोफावले

शिरूर कासार : आतापर्यंत मोठा पाऊसच झाला नाही. जो झाला त्यावर पिके जिवंत आहेत. मात्र पडत असलेला पाऊस हा तणपोशा असल्याचे चित्र आहे. या पिकातील गवत जनावरांना चारा म्हणून उपयोगी पडत असले तरी तो चारा मजुरीमुळे महागात पडत आहे, असे शेतकरी सांगतात.

Web Title: Kalsharohan of Kapileshwar temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.