९ व्या आंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कमलाकर कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:35 AM2021-07-30T04:35:00+5:302021-07-30T04:35:00+5:30

आंबाजोगाई साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष गणपत व्यास यांनी प्रा. कमलाकर कांबळे यांचे नूतन अध्यक्ष म्हणून नाव सुचविले. त्यास मसाप ...

Kamlakar Kamble as the President of the 9th Ambajogai Sahitya Sammelan | ९ व्या आंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कमलाकर कांबळे

९ व्या आंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कमलाकर कांबळे

Next

आंबाजोगाई साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष गणपत व्यास यांनी प्रा. कमलाकर कांबळे यांचे नूतन अध्यक्ष म्हणून नाव सुचविले. त्यास मसाप कार्यकारिणीने एकमताने मान्यता दिली, अशी माहिती मसापचे अध्यक्ष अमर हबीब यांनी दिली.

प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे

ज्येष्ठ लेखक व समीक्षक प्राचार्य कमलाकर कांबळे हे येथील खोलेश्वर महाविद्यालयात प्राचार्य आहेत. ते मसापच्या केंद्रीय कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य आहेत. यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे ते संस्थापक-उपाध्यक्ष आहेत. शिक्षक पुरस्कारासोबत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांची साहित्य संपदा म्हणजे दलित साहित्य-शोध आणि आस्वाद, महाउम्मग जातक कादंबरी वाङ्मयाचे आद्यस्वरूप, आठवणींचे पक्षी-एक अभ्यास, जातक कथा : लोककथा, ही पुस्तके प्रकाशित झाली असून, त्यांनी विपुल प्रासंगिक लेखन केले आहे.

ज्येष्ठांचे साहित्य व साहित्यात ज्येष्ठ

आंबाजोगाई येथील ज्येष्ठांचे साहित्य व मराठी साहित्यात ज्येष्ठ असे दोन परिसंवाद या साहित्य संमेलनात घेतले जाणार असून, ''नातीला पत्र'' या विषयावर एक पत्र लेखन स्पर्धा घेतली जाणार आहे.

कथा आंबाजोगाई

आंबाजोगाईच्या अकरा लेखकांच्या निवडक कथांचा संग्रह प्रकाशित केला जाणार असून, त्याचे संपादन अमर हबीब, अलका वालचाळे व अमृत महाजन करणार आहेत.

ज्येष्ठ नागरिक संघ

१६ व १७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ९ व्या आंबाजोगाई साहित्य संमेलनाचे यजमानपद ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने कमलताई बरुळे सांभाळत आहेत. आंबाजोगाईच्या सर्व रसिकांनी १०० रुपये भरून या संमेलनाचे स्वागत सभासद व्हावे, असे आवाहन कमलताई बरुळे यांनी केले.

290721\img-20210729-wa0012.jpg

प्राचार्य डॉ कमलाकर कांबळे

Web Title: Kamlakar Kamble as the President of the 9th Ambajogai Sahitya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.