कोरोना रोखण्यासाठी कऱ्हेवडगाव अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:33 AM2021-05-13T04:33:48+5:302021-05-13T04:33:48+5:30
आष्टी : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य व केंद्र सरकार प्रयत्न करीत ...
आष्टी : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य व केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील एकाही व्यक्तीला या विषाणूची बाधा होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन आरोग्य यंत्रणा व पोलीस विभागासह अन्य यंत्रणांना सोबत घेऊन दिवस-रात्र काम करीत आहे. यातच आष्टी तालुक्यातील कऱ्हेवडगाव ग्रामपंचायतही कोरोनाला रोखण्यासाठी सज्ज झाली आहे. सरपंच, उपसरपंच, ग्रा. पंचायत सदस्य, ग्रामसेवकांनी १२ मे रोजी सकाळी रस्त्यावर उतरून गावातील व्यावसायिकांनी गावाबाहेरील ग्राहक न करण्याच्या सूचना दिल्या तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास दुकाने सील करण्याची तंबी दिली. ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाची माहिती देण्यात आली.
आष्टी तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी तालुका प्रशासन घेत असून नागरिकांनी हात कशाप्रकारे धुतले पाहिजे, मास्क वापरा, सोशल डिस्टन्ससह घ्यावयाची काळजी व करावयाच्या उपाययोजना याची तांत्रिक माहिती देणारे बॅनर ग्रामपंचायतीने कार्यालयाबाहेर व नागरिकांच्या वर्दळीच्या ठिकाणी लावले आहेत. या बॅनरवरून हात कशाप्रकारे धुवावे याची माहिती ग्रामस्थांना मिळत आहे. तसेच कोरोना विषाणूची बाधा होऊ नये यासाठी दक्षता घेण्याबाबत जनजागृती करणारे बॅनर्स असल्याने वाचून नागरिक दक्ष होत आहेत. सोबत इतरांनासुद्धा कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबत माहिती देत त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम करीत आहे. या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी ग्रामस्थांनी नियमांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना सरपंच परिवंत गायकवाड, उपसरपंच सुग्रीव नागरगोजे, सदस्य अशोक विधाते, जालिंदर खांडवे, अर्जुन बांगर, शुभम खांडवे, ग्रामपंचायत कर्मचारी सलवार शेख यांनी रस्त्यावर उतरून दिल्या आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. दररोज ग्रामपंचायतीच्या वतीने नंदू कुलकर्णी लाऊडस्पीकरद्वारे कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देत आहेत.
चौकट
तर दुकाने सील करण्यात येतील
कोरोना या महामारीने हाहाकार माजवला असून, शेजारील गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्याने खबरदारी म्हणून गावातील व्यावसायिकांनी बाहेरील ग्राहक करू नयेत याबाबत व्यावसायिकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून दुकाने सील करण्यात येतील
- परिवंत गायकवाड, सरपंच, कऱ्हेवडगाव
===Photopath===
120521\img-20210512-wa0269_14.jpg