कापूस खरेदी सुरळीत ठेवा, अन्यथा कलेक्टर कचेरीसमोर आंदोलन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 12:16 AM2020-02-16T00:16:44+5:302020-02-16T00:17:18+5:30
पणन महासंघाने कापसाची खरेदी सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसच सुरू ठेवल्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून केंद्रावर खरेदी सुरू नसेल तर शेतकऱ्यांचा कापूस आणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे.
बीड : पणन महासंघाने कापसाची खरेदी सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसच सुरू ठेवल्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून केंद्रावर खरेदी सुरू नसेल तर शेतकऱ्यांचा कापूस आणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे.
जिल्ह्यात पणन महासंघाचे क्षेत्रीय कार्यालय परळी येथे आहे. त्यामध्ये आजपर्यंत १ लाख ३६ हजार ६९९ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. दुसरीकडे तितकाच कापूस शेतक-यांच्या घरात आहे. खरेदी केंद्रात एख दिवस काटा होतो तर दुसºया दिवशी खरेदी बंद ठेवली जात असल्याने शेतक-यांना ताटकळावे लागते. १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कापूस खरेदी बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पणन महासंघ व सीसीआयचे अधिकारी थट्टा करीत असल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे. अधिकारी आणि व्यापाºयांचे संगनमत असल्याचा संशय शेतकरी संघर्ष समितीने व्यक्त केला आहे.
व्यापाºयाचा कवडीमोल कापूस चांगल्या प्रतीचा म्हणून खरेदी केला जात आहे. तर शेतकºयांचा चांगल्या प्रतीचा कापूस असुनही त्याला कवडीमोल म्हणून त्याचे माप टाळले जाते. परिणामी शेतकरी ४७०० ते ४८०० रुपयांनी घालतो. तोच कापूस व्यापारी त्याच जिनिंगवर आणतात. ५३०० ते ५४०० रुपयांनी ग्रेडर घेतो असता प्रकार सर्व ठिकाणी सुरू असल्याचे शेतकरी संघर्ष समितीचे भाई थावरे म्हणाले.
जिल्हाधिका-यांनी यात लक्ष घालून कापूस खरेदी सुरळीत करावी, नसता पुढील आठवड्यात बैलगाडी व टेम्पोसह कापूस आणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे.
कापसात कवडीचे प्रमाण जास्त
१० फेब्रुवारी रोजी सुरेश प्रभाकर कुरे यांनी कापूस टोकन व फोल्डर क्रमांकानुसार खरेदी केंद्रावर आणला होता. मात्र या कापसात कवडीचे प्रमाण जास्त असल्याने एफएक्यूच्या दरात खरेदी करू शकत नसल्याने कापूस परत करण्यात आल्याचे लेखी पत्र कुप्पा येथील खरेदी केंद्राच्या प्रमुखाने दिले आहे.