कॅमेऱ्यांची नजर चुकवून मंदिरात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 11:58 PM2018-11-02T23:58:05+5:302018-11-02T23:58:40+5:30

तालुक्यातील ब्रम्हनाथ येळंब मधील ब्रम्हनाथाच्या मंदिरात झालेल्या चोरीच्या प्रकरणात चोरट्यांनी अत्यंत सफाईदारपणे आणि चाणाक्ष बुद्धी वापरून चोरी केल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला.

Keeping the camera out of sight and stolen in the temple | कॅमेऱ्यांची नजर चुकवून मंदिरात चोरी

कॅमेऱ्यांची नजर चुकवून मंदिरात चोरी

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांचा निष्कर्ष : ब्रम्हनाथाच्या अलंकार चोरीसाठी हॅन्डग्लोव्हज, मास्कचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरुर कासार : तालुक्यातील ब्रम्हनाथ येळंब मधील ब्रम्हनाथाच्या मंदिरात झालेल्या चोरीच्या प्रकरणात चोरट्यांनी अत्यंत सफाईदारपणे आणि चाणाक्ष बुद्धी वापरून चोरी केल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला.
दोन दिवसांपूर्वी ब्रम्हनाथ मंदिरात चोरट्यांनी दानपेटीसह देवाचे धातुंचे अलंकार चोरून नेले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान मंदिरातील चोरीप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक महेश टाक यांनी ब्रम्हनाथ येळंबसह परिसरातील विविध गावांना तपासाच्या दृष्टीने भेट दिली. दरम्यान चोरट्यांनी चोरलेली दानपेटी त्यातील रक्कम काढून दानपेटी विहिरीत फेकून दिली. विहिरीत मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने दापेटी बोहर काढता आली नाही. मंदिरात चोरी करताना चोरट्यांनी पाठीमागे कसलाही पुरावा सोडला नसल्याचे दिसून येत आहे. शिवाय चोरी करताना चोरांनी आपल्या हातांचे ठसे दानपेटीवर येवू नये म्हणून हॅन्डग्लोव्हजचा वापर केला आणि सी.सी.टि.व्ही.मध्ये आपला चेहरा येवू नये म्हणून मास्कचा वापर देखील केल्याचा अनुमान आहे. कॅमेºयांची नजर चुकवून चोरट्यांनी सफाईदारपणे देवाच्या अलंकारावर हात साफ केले.

Web Title: Keeping the camera out of sight and stolen in the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.