'वैद्यनाथ'च्या कर्मचारी, ऊसतोड कामगार- वाहतुकदारांचे पैसे थकवणे अशोभनीय: धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 03:25 PM2022-09-30T15:25:01+5:302022-09-30T15:25:33+5:30

वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना वेळेत सुरू करून क्षेत्रातील 100% ऊसाचे गाळप करावे

keeping money pending from Vaidyanath Sugar factory's employees, sugarcane workers and transporters is indecent: Dhananjay Munde | 'वैद्यनाथ'च्या कर्मचारी, ऊसतोड कामगार- वाहतुकदारांचे पैसे थकवणे अशोभनीय: धनंजय मुंडे

'वैद्यनाथ'च्या कर्मचारी, ऊसतोड कामगार- वाहतुकदारांचे पैसे थकवणे अशोभनीय: धनंजय मुंडे

Next

परळी (बीड) - वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा परळी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आत्मा, मात्र मागील काही वर्षात या कारखान्याची अवस्था वाईट झाली, यावर्षी ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असून कारखान्याकडे सुमारे साडेपाच लाख मेट्रिक टन उसाची नोंद आहे, त्यामुळे यावर्षी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना पूर्ण क्षमतेने व वेळेत सुरू व्हावा तसेच कारखान्याने क्षेत्रातील 100% ऊसाचे गाळप करावे, अशी मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी  एका निवेदनाद्वारे  कारखान्याकडे केली आहे. 

धनंजय मुंडे हे देखील वैद्यनाथ कारखान्याचे सभासद असून, त्यांनी शुक्रवारी वैद्यनाथ साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने कारखान्याच्या कार्यालयात भेट दिली. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कारखान्याचे कर्मचारी, ऊसतोड कामगार व वाहतूकदार यांच्या विविध मागण्यांचे निवेदन धनंजय मुंडे यांनी कारखान्याचे एमडी  जी. दीक्षितुलू, व्हाईस चेअरमन नामदेवराव आघाव यांना दिले. यावेळी कारखान्याच्या चेअरमन पंकजा मुंडे यांच्यावतीने संचालक फुलचंद कराड यांनी निवेदन स्वीकारले. 

स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब, स्व. पंडित अण्णा मुंडे या बंधूनी शेतकऱ्यांच्या हितार्थ हा कारखाना चालवून आशिया खंडात नावलौकिक केला. कर्मचारी हे कारखान्याचा कणा आहेत, त्यांचे पगार थकवणे हे अशोभनीय असल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या निवेदनात म्हटले असून कारखान्याने तातडीने वेतन अदा करावेत असा सल्लाही दिला आहे. काही ऊसतोड कामगार - वाहतूकदार यांनी आपल्याकडे निवेदने दिली असून, अनेकांची 2017 - 18 या हंगामासह 2021-22 या हंगामातील ऊसतोडणी, वाहतूक व मालकतोडीचे वाहतूक बिले देखील कारखान्याकडे प्रलंबित आहेत. हातावर पोट असलेल्या या वर्गाचे देयके कारखान्याने त्वरित अदा करावेत असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. 

मागील वर्षी शेतकऱ्यांना आपला ऊस घालण्यासाठी वेगळी झटपट करावी लागली आणि त्याचे पैसे मिळवण्यासाठी तर अजूनही शेतकऱ्यांची ससेहोलपट होत आहे, अशा परिस्थितीत वैद्यनाथ कारखान्याने वेळेत कारखाना सुरू करून क्षेत्रातील 100% ऊसाचे गाळप करावे तसेच ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी आदींचे थकीत पैसे द्यावेत अशी प्रमुख मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. कारखान्याच्या वतीने एम डी श्री. दीक्षितुलू यांनी सर्वच मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेण्याबाबत यावेळी आश्वस्त केले आहे.

याप्रसंगी धनंजय मुंडे यांच्यासह वैद्यनाथचे व्हाईस चेअरमन नामदेवराव आघाव, एम डी श्री. जी. दीक्षितुलू, संचालक फुलचंद कराड, युवा नेते अजय मुंडे, अभय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, ज्ञानोबा मुंडे, शिवाजी सिरसाट, ऍड. गोविंदराव फड, सूर्यभान नाना मुंडे, माणिकभाऊ फड, पिंटू मुंडे, सुरेश मुंडे, वसंत तिडके, बाबुराव जाधव, शरद राडकर, भगवान राडकर, पांडुरंग गंगणे, सुखदेव सांगळे, संतराम मुंडे, एकनाथ गुंजकर, राजाभाऊ पौळ, दिलीपराव कराड, मोहनराव सोळंके, मधुकर  झिंजुर्डे, रुस्तुम सलगर, अंगद कांदे, बालाजी चाटे, माणिक मुंडे, शेख सुलतान, वसंत राठोड, बालासाहेब चव्हाण, बंडू गुट्टे, विश्वांभर फड यांसह संचालक मंडळातील काही सदस्य, सभासद व शेतकरी उपस्थित होते.
 

Web Title: keeping money pending from Vaidyanath Sugar factory's employees, sugarcane workers and transporters is indecent: Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.