बीडमध्ये खुरपुडेबार्इंचा पोलिसांबरोबर लपंडाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:41 AM2018-04-13T00:41:04+5:302018-04-13T17:04:59+5:30
व्यायामशाळा अनुदानाचा हप्ता बँक खात्यावर जमा करण्यासाठी शिपायामार्फत ८० हजार रूपये घेतल्याप्रकरणी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांच्यावर ३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : व्यायामशाळा अनुदानाचा हप्ता बँक खात्यावर जमा करण्यासाठी शिपायामार्फत ८० हजार रूपये घेतल्याप्रकरणी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांच्यावर ३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्या फरार झाल्या. आठवडा उलटूनही त्या अद्याप एसीबीला सापडलेली नाहीत. सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्या पोलिसांना चकवा देत खुरपुडेबाई खुलेआम फिरत असल्याने एसीबीची संशयाच्या भोवºयात सापडली आहे. खुरपुडेच्या निलंबनाचे आदेशही कार्यालयात धडकले आहेत.
जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्हा क्रीडा संकुल आणि कार्यालयाचे नियोजन ढेपाळले. एवढेच नव्हे तर संकुलात क्रीडा प्रेमींसह खेळाडूंना कसल्याच सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. येथे आलेला निधी गुत्तेदार आणि आपल्या सहकारी अधिकाºयांच्या संगनमताने हडप केला. त्यामुळे कार्यालयाचा कारभार पूर्णपणे ढेपाळला. सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त जात केला होता. असे असतानाही आपण कुठल्याच कामाकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करीत नसल्याचा आव नंदा खुरपुडे आणत होत्या.
३ एप्रिल रोजी खुरपुडे यांनी शिपाई शेख फईमोद्दीन यांच्या हस्ते लाच दोन लाख रूपयांची लाच मागितली. पैकी ८० हजार रूपये घेताना फईमला रंगेहाथ पकडले. कारवाई झाल्याचे समजताच खुरपुडे यांनी सूंबाल्या केला. त्यांना अटक करण्यासाठी बीडसह लातूर व इतर ठिकाणच्या एसीबीला माहिती देण्यात आली. आठ दिवस उलटूनही त्या अद्याप पोलिसांना सापडल्या नाहीत.
अट्टल दरोडेखोर, चोरटे आणि वर्ग एकच्या अधिकाºयांना आपल्या ‘चाणाक्ष’ बुद्धीच्या आधारे बेड्या ठोकणाºया एसीबीला मात्र खुरपुडे बाई आठवड्यानंतरही सापडत नसल्याने संशय व्यक्त केला जात आहे.
याबाबत बीडचे पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्याशी संपर्क केला, परंतु त्यांनी भ्रमणध्वनी न घेतल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.
आता पदभार कोणाकडे ?
नंदा खुरपुडे यांच्या निलंबनाचे आदेश नुकतेच क्रीडा कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. आता या पदाचा अतिरिक्त पदभार कोणाकडे, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
सध्या कार्यालयात अरविंद विद्यागर हे एकमेव अधिकारी असून इतर क्रीडा मार्गदर्र्शक आहेत.
परंतु यापूर्वी क्रीडा मार्गदर्शक अजय पवार यांच्याकडे पदभार सोपविला होता. आता या पदाचा पदभार कोणाकडे, याची उत्सुकता लागली आहे.