खामगांव - पंढरपुर या पहिल्या सिमेंट-कॉंक्रीट महामार्गाच्या कामाला माजलगाव येथून सुरुवात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 05:54 PM2017-10-10T17:54:36+5:302017-10-10T18:02:30+5:30

माजलगांव मतदारसंघातुन जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग 568 सी खामगांव - पंढरपुर या रस्त्याच्या सिमेंट-कॉंक्रीटकरणाच्या कामाला आज माजलगाव येथून सुरुवात झाली.

Khamgaon-Pandharpur first cement-concrete highway starts from Majalgaon | खामगांव - पंढरपुर या पहिल्या सिमेंट-कॉंक्रीट महामार्गाच्या कामाला माजलगाव येथून सुरुवात 

खामगांव - पंढरपुर या पहिल्या सिमेंट-कॉंक्रीट महामार्गाच्या कामाला माजलगाव येथून सुरुवात 

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्ग रस्ते विकास महामंडळाच्या वतीने खामगांव - पंढरपुर हा 435 किमी लांबीचा रस्ता होणार  हा सिमेंट-कॉंक्रीट महामार्ग राज्यात माॅडेल ठरणारमाजलगांव - केज या 60 किमीच्या पहिल्या टप्प्यास सुरुवात अत्याधुनिक मशिनच्या सहाय्याने येत्या 24 महिन्यात 60 किमीचे काम होणार पूर्ण 

माजलगांव ( बीड) , दि. १० : माजलगांव मतदारसंघातुन जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग 568 सी खामगांव - पंढरपुर या रस्त्याच्या सिमेंट-कॉंक्रीटकरणाच्या कामाला आज माजलगाव येथून सुरुवात झाली. येत्या 24 महिन्यात 60 किमीचे काम पूर्ण होऊन सिमेंट-कॉंक्रीटचा हा महामार्ग एक मॉडेल ठरेल असा विश्वास माजलगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आर. टी. देशमुख व कार्यकारी अभियंता उदय भरडे यांनी व्यक्त केला.

आज दुपारी 2 वाजता खामगांव - पंढरपुर राष्ट्ीय महामार्गाच्या माजलगांव - केज या 60 किमीच्या पहिल्या टप्यातील कामाची सुरुवात तेलगांव जवळील कारी फाटा येथून करण्यात आली.  यावेळी बाजार समितीचे माजी सभापती नितीन नाईकनवरे, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष गोरख धुमाळ,  भा. ज. पा. तालुकाध्यक्ष हनुमान कदम, नगराध्यक्ष सहाल चाऊस, बबनराव सोळंके, दिलीप बिल्डकाॅन कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर बिमलराम शुक्ला,  सभापती महादेव बडे, महादेव तोंडे, सचिन डोंगरे, माणिक दळवे, रामेश्वर सावंत, अर्जुन तिडके, दत्ता सोळंक, अमोल सोंळके, यांची उपस्थिती होती. 

यावेळी बोलतांना आमदार आर. टी. देशमुख व उदय भरडे म्हणाले की, खामगांव - पंढरपुर हा राष्ट्ीय महामार्ग रस्ते विकास महामंडळाचे वतीने 435 किमी लांबीचा आहे. यातील 288 कोटी रूपये खर्चाचा माजलगांव - केज हा पहिला टप्पा आहे. महामंडळाने सहा हजार कोटींचे 25 मार्गाचे काम हाती घेतले आहे.

अत्याधुनिक मशीनने होणार काम 
या रस्त्यात 110 छोटे - मोठे पुलांची कामे प्रगतीपथावर आहेत. माजलगांव - केज या सिमेंट रस्त्याचे कामासाठी सात कोटी रूपयांची अत्याधुनिक पहीली मशिन आली असुन त्या द्वारे हे काम होणार आहे. दिलीप बिल्डकाॅन कंपनीच्या वतीने ही मशिन दररोज सिमेंटचा 1 किमी एका बाजुचा रस्ता पुर्ण करणार आहे.

जानेवारीत माजलगाव शहरात रस्ता 
जानेवारीपर्यंत माजलगांव शहरात रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. शहरामध्ये 24 मिटर चारपदरी रस्त्यामध्ये दुभाजक, फुटपाथ, नाल्या, पथदिवे करण्यात येणार आहेत. त्यासाठी या रस्त्यातील विजेचे खांब, अतिक्रमणे हटवुन दर्जेदार असे काम करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार देशमुख व  कार्यकारी अभियंता उदय भरडे यांनी यावेळी दिली.

Web Title: Khamgaon-Pandharpur first cement-concrete highway starts from Majalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.