खामगाव-पंढरपूर रस्ता १०० फुटांचा होण्यासाठी अन्नत्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 12:11 AM2018-10-08T00:11:30+5:302018-10-08T00:12:29+5:30

शहरातून जाणारा खामगाव-पंढरपूर रस्ता हा जिव्हाळ्याचा प्रश्न असून, या रस्त्याची रूंदी शहरात १०० फुटाची झाली पाहिजे. या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे भाई अ‍ॅड.नारायण गोले यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी चिंचगव्हाण येथील बळीराजा निवास येथे रविवारी सकाळपासून अन्नत्याग सुरु केले.

Khamgaon-Pandharpur road should be 100 ft | खामगाव-पंढरपूर रस्ता १०० फुटांचा होण्यासाठी अन्नत्याग

खामगाव-पंढरपूर रस्ता १०० फुटांचा होण्यासाठी अन्नत्याग

Next
ठळक मुद्देजिव्हाळ्याचा प्रश्न : शेकापचे भाई नारायण गोले यांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : शहरातून जाणारा खामगाव-पंढरपूर रस्ता हा जिव्हाळ्याचा प्रश्न असून, या रस्त्याची रूंदी शहरात १०० फुटाची झाली पाहिजे. या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे भाई अ‍ॅड.नारायण गोले यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी चिंचगव्हाण येथील बळीराजा निवास येथे रविवारी सकाळपासून अन्नत्याग सुरु केले.
माजलगावातून जाणारा खामगाव-पंढरपूर रस्ता हा तालुक्यातील जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न असून, या प्रश्नावर तालुक्यातील विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पत्रकार बांधव यांनी अनेक मार्गाने आंदोलने केले. परंतू हा प्रश्न मार्गी लागला नाही. तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर जिल्हाधिकारी असताना माजलगावातील अतिक्र मण हटवून त्यांनी सदरील रस्ता १०० फुटांचा खुला करून दिला होता. परंतु त्यानंतर राज्यकर्ते व प्रशासनाच्या उदासिनतेमुळे सदरील रस्त्यावर अतिक्रमण झाले असून, वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. तालुक्यातील जनतेला त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी १०० फूट रस्ता करण्याच्या मागणीसाठी भारिपच्या वतीने आंदोलन करण्यात आले असता त्यांना लेखी दिलेल्या पत्रात १०० फुटाचा रस्ता करण्याचे सांगूनही प्रत्यक्षात ७० फुटाचाच रस्ता करून नाली तयार करण्याची प्रक्रि या सुरू झाली असल्यामुळे शेकापने आंदोलन सुरू केले आहे.

Web Title: Khamgaon-Pandharpur road should be 100 ft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.