परळी तालुक्यातील खरिपाची पिके धोक्यात - A - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:38 AM2021-08-17T04:38:42+5:302021-08-17T04:38:42+5:30
परळी : तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. पाऊस नसल्याने खरिपातील सोयाबीन, मूग, बाजरी, कापूस, ज्वारी आदी ...
परळी : तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. पाऊस नसल्याने खरिपातील सोयाबीन, मूग, बाजरी, कापूस, ज्वारी आदी पिके करपून जात आहेत. परळी तालुक्यातील बेलंबा, कौठळी, मलकापूर आदी गावांतील शेतकऱ्यांच्या बांधावर भाजपचे राजेश गिते यांनी जाऊन पिकांची पाहणी केली. परिस्थिती फार बिकट आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावून गेला आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी गिते यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे. निवेदनावर अनिल गुट्टे, धुराजी साबळे, भरतराव इंगळे, मारोतराव आंधळे, दशरथ गिते, प्रदीप गिते, भास्कर गिते, बळीराम गिते, दत्तू गिते, बालाजी गुट्टे, अरविंद गुट्टे, शिवाजी डापकर, श्रीराम डापकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.