आष्टी तालुक्यात ३० हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:22 AM2021-06-20T04:22:43+5:302021-06-20T04:22:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कडा : शेतीची पेरणीपूर्व मशागत करून पावसाची वाट पाहत असलेल्या शेतक-यांनी पंधरा दिवसांत तीस हजार हेक्टर ...

Kharif sowing on 30,000 hectare area in Ashti taluka | आष्टी तालुक्यात ३० हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी

आष्टी तालुक्यात ३० हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कडा : शेतीची पेरणीपूर्व मशागत करून पावसाची वाट पाहत असलेल्या शेतक-यांनी पंधरा दिवसांत तीस हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी केली आहे. असे असले तरी समाधानकारक पाऊस नसल्याने ६५ हजार हेक्टर क्षेत्राला पेरणीची प्रतीक्षा आहे.

थोड्या फार झालेल्या पावसावर शेतकरी घाईत पेरण्या उरकू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

आष्टी तालुक्यात खरिपाच्या पेरणीसाठी ९५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. तालुक्यातील शेतक-यांनी खरिपाच्या पेरणीची गडबड न करता पुरेशी ओल झाल्यावरच पेरणी करावी. नसता दुबार पेरणीचे संकट ओढवले जाईल. यासाठी कृषी विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी केले आहे.

Web Title: Kharif sowing on 30,000 hectare area in Ashti taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.