'खोक्याचं तोंड बर्फाच्या पाण्यात बुडवलं, सतीश भोसलेला मारहाण केली'; वकिलांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 21:17 IST2025-04-04T21:14:04+5:302025-04-04T21:17:04+5:30
बीड जिल्ह्यातील सतीश उर्फ खोक्या भोसले याला मारहाणी प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी खोक्याला ताब्यात घेतले.

'खोक्याचं तोंड बर्फाच्या पाण्यात बुडवलं, सतीश भोसलेला मारहाण केली'; वकिलांचा गंभीर आरोप
बीड जिल्ह्यातील सतीश उर्फ खोक्या भोसले याला मारहाण प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी खोक्याचा ताबा घेतला. फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी खोक्या भोसले याला पीसीआर घेण्याआधीच मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याच्या पाठीवरती मारहाण झाल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. दरम्यान, आता या प्रकरणावरुन त्याच्या वकिलांनी फॉरेस्ट अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे.
बापरे! अवकाळीने राज्याचा मोठा घात केला; पाऊस २६ हजार हेक्टरचे नुकसान करून गेला
सतीश भोसले याचे वकील शशिकांत सावंत म्हणाले, पूर्वीच्या दोन गुन्ह्यामधील पोलीस कोठडी झाल्यानंतर फॉरेस्टने सतीश भोसलेचा ताबा घेतला होता. ताबा घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला कोर्टासमोर उभा करुन पीसीआर घेणे आवश्यक होते, त्यानंतर काय चौकशी करायची होती. पण फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतल्या घेतल्या मारहाण केली, असा गंभीर आरोप सतीश भोसले याचे वकील शशिकांत सांवत यांनी केला आहे.
वकील शशिकांत सावंत म्हणाले, सतीश भोसलेला मारहाण केली. जाणून बुजून लोकांची नावे घेण्यासाठी दबाव टाकला. बर्फाच्या पाण्यात टाकून मारण्यात आले. टायरमध्ये टाकले. ज्याला आपण थर्ड डिग्री म्हणतो ती पद्धत वापरण्यात आली. पाच वाजता न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याने न्यायालयाकडे मारहाणीची तक्रार केली. न्यायालयाने सर्व पाहिले आणि त्याच मेडिकल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाने एकही दिवसाचा पीसीआर दिला नाही. न्यायालयाने फॉरेस्ट अधिकाऱ्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले, असंही वकिलांनी सांगितले.
दबावाखाली खोक्याला मारहाण
"एखाद्या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर कोर्टाने पीसीआर दिल्याशिवाय काही करायचे नसते. मारहाण करणे आता कायद्याने बंदी आहे. कायद्याचे उल्लंघन केले आहे. न्यायालयाने एमसीआर दिला आहे. कोणाच्या तरी दबावाखाली मारणे हे चुकीचे आहे. कोर्टाने तक्रार देऊ शकता असं सांगितले म्हणून आम्ही तक्रार काल दिली आहे, असंही वकिलांनी सांगितले.