‘त्या’ अपहृत मुलीची २४ तासांत सुटका; बीड ग्रामीण पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 04:39 PM2018-05-25T16:39:15+5:302018-05-25T16:39:15+5:30
मित्राच्या १३ वर्षीय बहिणीला पळवून नेणाऱ्या तरुणास बीड ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांनी २४ तासाच्या आतमध्ये जेरबंद केले. पीडित मुलीला सुखरूप नातेवाईकांच्या हवाली केले.
बीड : मित्राच्या १३ वर्षीय बहिणीला पळवून नेणाऱ्या तरुणास बीड ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांनी २४ तासाच्या आतमध्ये जेरबंद केले. पीडित मुलीला सुखरूप नातेवाईकांच्या हवाली केले.
बीड ग्रामीण ठाण्यात २० मे रोजी ८ वीत शिक्षण घेणाऱ्या १३ वर्षीय मुलीला एका १८ वर्ष वयाच्या तरुणाने पळवून नेल्याची तक्रार दाखल झाली होती. मुलीच्या भावाशी असलेल्या मैत्री मधून त्याचे सतत घरी येणे जाणे असायचे. याचाच गैरफायदा घेऊन भावाबरोबरच्या मैत्रीच्या आडून त्याने तिच्याशी सलगी वाढवली. सदरील मुलगी रविवारी आजोळी गेली असता तिला तेथूनच पळवून घेऊन गेला आणि पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे तक्रार दाखल झाली.
मुलीबरोबर हा मुलगाही गायब असल्याने भावाच्या मित्राबाबत संशय निर्माण झाला होता. त्यावरून पोलिसांनी ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य यांच्या माध्यमातून माहिती घेण्यास सुरुवात केली. आणि गुन्हा दाखल झाल्यापासून २४ तासाच्या आत मुलगी मुलासह शोधण्यास यश मिळविले.
पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्म, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनखाली सपोनि शीतलकुमार बल्लाळ, पोहेकॉ हनुमान इंगळे, रमेश दुबाले, जयसिंग वाघ, अमोल येळे, दिनेश ढाकणे यांनी कामगिरी पार पाडली आहे.