कोरोनानंतर अनेकांना किडनीचा आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:23 AM2021-07-16T04:23:57+5:302021-07-16T04:23:57+5:30

कोरोनाच्या पहिल्या लाटेत काही दिवस कोरोनाला रोखण्यात प्रशासनास यश आले. परंतु कालांतराने अनेकांना बाधा झाली. त्यानंतर दुसऱ्या लाटेत ...

Kidney disease in many after corona | कोरोनानंतर अनेकांना किडनीचा आजार

कोरोनानंतर अनेकांना किडनीचा आजार

Next

कोरोनाच्या पहिल्या लाटेत काही दिवस कोरोनाला रोखण्यात प्रशासनास यश आले. परंतु कालांतराने अनेकांना बाधा झाली. त्यानंतर दुसऱ्या लाटेत मार्चपासून कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढली, तर एप्रिलमध्ये दिवसाला १०० ते १५० रुग्ण रोज आढळू लागल्याने रुग्णालयेदेखील हाऊसफुल्ल झाली होती. सध्या कोरोना रुग्णांची संख्या घटली असली, तरी कोविडनंतर अनेकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. काहीजणांना पोटदुखी, सांधेदुखी, शरीरावर खाज येण्यासह विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यात सर्वाधिक त्रास किडनीचा आजार असलेल्या रुग्णांना होत आहे. कोरोना झाल्यानंतर काही आजार असलेल्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यात किडनी, हृदयविकार, पोटदुखी आदी आजार असलेल्यांनी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार करावेत. कोरोनाची लाट कमी होत असली तरी बाजारात गर्दीत प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे गर्दीत जाणे टाळा. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पौष्टिक आहार घेणे, योगा, व्यायाम आवश्यक आहे. रुग्णालयात अथवा बाजारपेठेत जाताना मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे. फॅमिली डॉक्टरांशी बोलूनच औषधे घ्यावीत, असे ते म्हणाले.

-----------

कोरोनाची लागण झालेल्या अनेक रुग्णांवर स्टेरॉईडचा अतिरेकी वापर केल्याने अनेकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे स्टेरॉईडचे प्रमाण किती असावे आणि त्या रुग्णाची पूर्वपरिस्थिती, आजार माहिती असणाऱ्या त्यांच्या फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच कोरोनासाठी औषधोपचार घ्यावेत. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच किडनीसंबंधी आजार असलेल्या रुग्णांवरही शासकीय रुग्णालयात उपचार करून ठणठणीत केले आहे. शासकीय रुग्णालयात सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत.

: डॉ. सिद्धेश्वर बिराजदार,

मेडिसिन विभागप्रमुख, स्वाराती रुग्णालय, अंबाजोगाई.

Web Title: Kidney disease in many after corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.